आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुद्धिबळ:तेलंगणाचा 15 वर्षीय युवा प्रणीत बनला भारताचा 82 वा ग्रँडमास्टर

दिव्य मराठी नेटवर्क | बाकू21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तेलंगणाच्या १५ वर्षीय प्रणीतची सध्या बाकू अाेपन बुद्धिबळ स्पर्धेतील कामगिरी लक्षवेधी ठरली अाहे. त्याने स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये अमेरिकेच्या ग्रँडमास्टर हंस नीमनचा पराभव केला. यासह त्याने ग्रँडमास्टर हाेण्याचा बहुमान पटकावला अाहे. ताे अाता भारताचा ८२ वा अाणि तेलंगणा राज्याचा सहावा ग्रँडमास्टर ठरला अाहे. या युवा बुद्धिबळपटूने गत मार्च महिन्यात पहिले मानांकन मिळवले हाेते. याठिकाणी त्याने इंटरनॅशनल मास्टर हाेण्याचा पराक्रम गाजवला हाेता. अाता त्याची बाकु अाेपनमधील कामगिरी सरस ठरली अाहे. त्याने या स्पर्धेतील फेरीमध्ये अचुक चालीवरून विजयाची नाेंेद केली. त्यामुळे त्याला अाता अंतिम फेरीतही विजयाचा कित्ता यशस्वीपणे गिरवता अाले. त्याने यादरम्यान अचुक चालीवर अमेरिकेच्या ग्रँडमास्टर हंसला पराभूत केले.