आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्पोर्ट्स:मेसीच्या खरेदीसाठी मँचेस्टर सिटीला 1550 कोटी रु. खर्च करावा लागेल; बार्सिलोनाशी मेसीचा करार 2021 मध्ये समाप्त होत आहे, क्लब 6 हजार कोटी मागतोय

बार्सिलोना5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बार्सिलोनासोबत मेसीचा करार २०२१ मध्ये समाप्त होत आहे
लियोनेल मेसी दोन दशकांनंतर स्पॅनिश फुटबॉल क्लब बार्सिलोना सोडू शकतो. याबाबतीत त्याने क्लबलादेखील सांगितले आहे. इंग्लिश क्लब मँचेस्टर सिटी मेसीला खरेदी करण्याच्या शर्यतीत सर्वात पुढे आहे. त्यासाठी त्यांना कमीत कमी १५५० कोटी रुपये खर्च करावे लागू शकतात. मात्र, बार्सिलोनाने म्हटले की, मेसीचा करार २०२१ पर्यंत आहे. अशात खरेदी करणाऱ्या क्लबला त्याला ६१०० कोटी रुपये द्यावे लागतील.

मेसीला खरेदी करण्यासाठी अनेक क्लब पुढे येत आहेत. मात्र, पेप गुआर्डियोलाचा क्लब सिटी सर्वात पुढे आहे. मेसीला गुआर्डियोला आवडतोही. अशात सिटी मेसीला खरेदी करण्यासाठी संपूर्ण ताकद लावतोय. दुसरीकडे, बार्सिलोना मेसीला आपल्यासोबत कायम ठेवण्यासाठी रक्कम वाढवू शकतो.

मँचेस्टर सिटी १३०० कोटींसह ३ खेळाडू बार्सिलोनाला देऊ शकतो
माहितीनुसार, सिटी मेसीसाठी ८७० कोटी ते १३०० कोटींदरम्यान खर्च करण्यास तयार आहे. त्याबरोबर क्लब गेब्रियल जीझस व दोन इतर खेळाडू देऊ शकतात. मेसीची रक्कम ६९० कोटींच्या जवळपास आहे. अशात सिटीला १५५० ते १९९५ कोटी रुपये खर्च करावा लागेल. त्यांच्या करारानुसार संपूर्ण रक्कम द्यावी लागली तर ती ६८०० कोटी आहे. सिटी मेसीसोबत दीर्घ काळ करार करू इच्छितो. मात्र, नियमाप्रमाणे १० जूनपूर्वी मेसी क्लब सोडू शकत नाही.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser