आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • 16th Aerobic Gymnastics National Championship, Maharashtra Wins With 11 Gold Medals, Manipur Team Runners up| Marathi News

दिव्य मराठी विशेष:16 वी एरोबिक जिम्नॅस्टिक्स राष्ट्रीय स्पर्धा, महाराष्ट्राला 11 सुवर्णपदकांसह विजेतेपद, मणिपूर संघ उपविजेता

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू (कर्नाटक) येथे झालेल्या १६ व्या राष्ट्रीय एरोबिक्स जिम्नॅस्टिक स्पर्धेत एकूण २१ पदकांसह महाराष्ट्राच्या संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. यात ११ सुवर्ण, ५ रौप्य व ५ कांस्यपदकांचा समावेश आहे. मणिपूरने ६ पदकांसह उपविजेतेपद मिळवले, तर ४ पदकांसह सेनादलाला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. स्पर्धेत डॉ. मकरंद जोशी यांनी स्पर्धा प्रमुख म्हणून कामगिरी बजावली. त्याचबरोबर सिद्धार्थ कदम, अमेय जोशी, नीलेश जोशी, निशा महाजन यांनी पंच म्हणून काम पाहिले.

विजेते खेळाडू : नॅशनल डेव्हलपमेंट गट - आर्यन फुले (रौप्य), सृष्टी खोडके (सुवर्ण). दुहेरी - प्रज्वल अंबोरे व गौरी पाते (सुवर्ण). तिहेरी - सर्वज्ञ कनकदंडे, सर्वाध्य बिंदू व ऋतुराज वाघ (सुवर्ण).

बातम्या आणखी आहेत...