आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • 19 year old Carles Becomes Youngest Number One, Spain's Carles Wins Men's Singles Title; Casper Runner up

यूएस ओपन:19 वर्षीय कार्लाेस सर्वात युवा नंबर वन, स्पेनच्या कार्लाेसने जिंकला पुरुष एकेरीचा किताब; कॅस्पर उपविजेता

मॅथ्यू फॅटरमॅन23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पेनचा १९ वर्षीय कार्लाेस अल्कारेज रविवारी मध्यरात्री सत्रातील शेवटच्या ग्रॅडस्लॅम अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेचा चॅम्पियन ठरला. त्याने पुरुष एकेरीचा किताब पटकावला. त्याने फायनलमध्ये नॉर्वेच्या कॅस्पर रूडचा पराभव केला. स्पेनच्या युवा टेनिसपटूने आर्थर एेश स्टेडियमच्या काेर्टवर २४ हजार चाहत्यांच्या साक्षीने ६-४, २-६, ७-६, ६-३ अशा फरकाने राेमहर्षक विजयाची नाेंद केली.

या किताबासाठी कार्लाेस हा जगातील नंबर वन टेनिसपटू ठरला आहे. ताे आता जगातील सर्वात युवा नंबर वन टेनिसपटू ठरला. त्याने आपल्या करिअरमध्ये पहिल्यांदाच ग्रँडस्लॅम किताब जिंकला आहे. स्पेनच्या १९ वर्षीय टेनिसपटू कार्लाेस अल्कारेजने ३ तास २० मिनिटांत राेमहर्षक विजयाची नाेंद केली. यासह त्याने दुहेरी यश संपादन केले. त्याने किताबासह जगातील नंबर वन हाेण्याचाही बहुमान पटकावला. यादरम्यान त्याने डॅनियल मेदवेदेवची नंबर वन स्थानावरून घसरण केली. आता कार्लाेस हा जगातील नंबर वन टेनिसपटू ठरला आहे.

बातम्या आणखी आहेत...