आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजगातील नंबर वन इगा स्वातेक सत्रातील दुसऱ्या ग्रँडस्लॅम फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत चॅम्पियन ठरली. तिने शनिवारी स्पर्धेत महिला एकेरीचा किताब पटकावला. पोलंडच्या या टेनिसपटूने महिला एकेरीच्या फायनलमध्ये अमेरिकेच्या १९ वर्षीय कोको ग्रॉफचा पराभव केला. तिने अवघ्या ६८ मिनिटांमध्ये ६-१, ६-३ अशा फरकाने एकतर्फी विजय संपादन केला. यासह पहिल्यांदाच ग्रँडस्लॅमची फायनल गाठणाऱ्या कोकोला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. दुसरीकडे विजयासह नंबर वन इगा स्वातेकने आपल्या करिअरमध्ये दुसऱ्यांदा या स्पर्धेत चॅम्पियन होण्याचा पराक्रम गाजवला.
तिने यापूर्वी २०२० मध्येही किताब पटकावला होता. फायनल गाठताच चॅम्पियन ही मोहीम तिने आताही कायम ठेवली. तिने गत दोन वर्षांपूर्वीही पहिल्यांदा अंतिम फेरी गाठत किताब जिंकला होता. याशिवाय तिने फायनल गाठताच जेतेपद जिंकण्याची मोहीम नवव्या स्पर्धेतही कायम ठेवली. तिने नवव्यांदा फायनलमध्ये प्रवेश केला.
स्वातेकचा सलग ३५ वा विजय; व्हीनसच्या विक्रमाशी साधली बराेबरी पोलंडच्या इगा स्वातेकने आपली विजयी मोहीम कायम ठेवताना किताबाचा पल्ला गाठला. तिने यंदा सलग ३५ व्या विजयाची नोंद केली. यासह तिने माजी नंबर वन टेनिसपटू व्हीनसच्या सलग ३५ सामने जिंकण्याच्या विक्रमाची बरोबरी साधली. यासह चॅम्पियन स्वातेकला आता आगामी सामन्यातील विजयाने व्हीनसलाही विक्रमात मागे टाकण्याची मोठी संधी आहे. लेवानडोस्कीची उपस्थिती : महिला एकेरीच्या फायनलदरम्यान पाेलंडचा सुपरस्टार फुटबॉलपटू रॉबर्ट लेवानडोस्की उपस्थित होता.
कॅस्पर रुड ग्रँडस्लॅमची फायनल गाठणारा नॉर्वेचा पहिला टेनिसपटू नॉर्वेच्या कॅस्पर रुडने आपली विजयी मोहीम कायम ठेवताना करिअरमध्ये पहिल्यांदाच ग्रँडस्लॅमची फायनल गाठली. त्याने शनिवारी सत्रातील दुसऱ्या ग्रँडस्लॅम फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीचा पल्ला गाठला. नॉर्वेच्या या २३ वर्षीय टेनिसपटूने उपांत्य सामन्यात यूएस ओपन चॅम्पियन मारिन सिलिचचा पराभव केला. त्याने दोन तास ५५ मिनिटे शर्थीची झुंज देत ३-६, ६-४, ६-२, ६-२ अशा फरकाने सामना जिंकला. यासह त्याला अंतिम फेरीचा पल्ला यशस्वीपणे गाठता आला.
तसेच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेची फायनल गाठणारा कॅस्पर हा नॉर्वेचा पहिला टेनिसपटू ठरला. आता त्याला किताबासाठी क्ले कोर्टवरील किंग राफेल नदालच्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. कॅस्पर रुडला लहानपणी वडिलांनी टेनिससाठी मार्गदर्शन केले. मात्र त्यानंतर तंत्रशुद्ध प्रशिक्षणासाठी त्याला नदालच्या अकादमीमध्ये दाखल करण्यात आले. यामध्ये रुडने नदालच्या मार्गदर्शनाखाली आपल्या टेनिसच्या कामगिरीचा दर्जा उंचावला. आता त्याच्या आव्हानाचा रुडला फायनलमध्ये सामना करावा लागणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.