आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडेन्मार्कच्या १९ वर्षीय हाेल्गर रुनेने आपली सनसनाटी विजयाची माेहीम कायम ठेवताना दाेन आठवड्यांत दाेन माेठे किताब जिंकले. त्याने सत्रातील पॅरिस मास्टर्स टेनिस स्पर्धेत चॅम्पियन हाेण्याचा बहुमान पटकावला. त्याने साेमवारी जगातील माजी नंबर वन नाेवाक जाेकाेविकला धूळ चारली. त्याने ३-६, ६-३, ७-५ अशा फरकाने अंतिम सामना जिंकला. यासह ताे किताबाचा मानकरी ठरला. तसेच त्याने गत आठवड्यात जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या सितसिपासला धूळ चारली हाेती. यासह ताे स्टाॅकहाेम आेपनमध्ये किताब विजेता ठरला हाेता. त्याने ६-४, ६-४ अशा फरकाने ही फायनल जिंकली हाेती. यादरम्यान त्याने आक्रमक खेळीतून हा एकतर्फी विजय साकारला हाेता. आता त्याने हीच लय कायम ठेवत पॅरिसमध्ये अंतिम सामना जिंकला. त्यामुळे सर्बियाच्या टेनिसपटूला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. यादरम्यान माजी नंबर वन जाेकाेविकने दमदार सुरुवात करताना पहिला सेट जिंकला हाेता. मात्र, त्याला पुढील दाेन्ही सेटदरम्यान आपली लय कायम ठेवता आली नाही. दरम्यान, डेन्मार्कच्या हाेल्गरने सरस खेळीतून सामना जिंकला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.