आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • 2 Goals In Five Minutes Turn The Tide, Saudi Arabia's Sensational 2 1 Win Over Argentina

फिफा विश्‍वचषक - साखळी सामने:पाच मिनिटांत 2 गाेलने सामन्याला कलाटणी, साैदी अरेबियाचा अर्जेंटिनावर 2-1 ने सनसनाटी विजय

लुसैल9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अर्जेंटिनाचा32वर्षांनंतर धक्कादायक पराभव

फिफा विश्वचषकाच्या तिसऱ्या दिवशी नवख्या संघाने सनसनाटी विजय संपादन करून जगभरातील फुटबाॅलप्रेमींचे लक्ष वेधून घेतले आहे. सहाव्यांदा विश्वचषकासाठी पात्र ठरलेल्या साैदी अरेबिया फुटबाॅल संघाने क गटातील आपल्या पहिल्याच सामन्यात दाेन वेळच्या विश्वविजेत्या अर्जेंटिना टीमला धूळ चारली. सालेह अलशेहरी (४८ वा मि.) आणि सालेम अलदावसारीने (५३ वा मि.) पाच मिनिटांत दाेन गाेल करून साैदी अरेबिया संघाला २-१ ने दणदणीत विजय मिळवून दिला. किताबाचा प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या अर्जेंटिना संघाकडून लियाेनेल मेसीने (१० वा मि.) एकमेव गाेल केला. पाच मिनिटांत झालेल्या दाेन राेमहर्षक गाेलने सामन्याला कलाटणी मिळाली. पिछाडीवर असलेल्या अर्जेंटिना टीमला शेवटच्या मिनिटांपर्यंत सामन्यात दुसरा गाेल करता आला नाही. तसेच अर्जेंटिना टीमला १९९० नंतर पहिल्यांदाच नवख्या संघाकडून धक्कादायक पराभवाला सामाेरे जावे लागले. ३२ वर्षांपूर्वी कॅमरून संघाने मेसीच्या अर्जेटिना टीमला १-० ने धूळ चारली हाेती. आता हाच कित्ता साैदी संघाने गिरवला आहे.

धक्कादायक निकाल इटली 0-1 नॉर्थ कोरिया 1996 स्पेन 0-1 नार्दर्न आयर्लंड 1982 अर्जेंटिना 0-1 कॅमरून 1990 अमेरिका 1-0 इंग्लंड 1950 स्पेन 0-1 स्वित्झर्लंड 2010 स्काॅटलंड 3-2 हाॅलंड 1978 सेनेगल 1-0 फ्रान्स 2002 हाॅलंड 5-1 स्पेन 2014 द. कोरिया 2-1 इटली 2002 अर्जेंटिना 1-2 साैदी अरेबिया 2022

प्रशिक्षकांचा फाॅर्म्युला ... शरीर थरथर कापेपर्यंत खेळाडूंकडून कसून सराव प्रचंड मेहनत केल्याशिवाय यशाचा पल्ला गाठता येत नाही. त्यामुळे कष्ट महत्त्वाचे आहेत. हाच फाॅर्म्युला फ्रान्सचे हार्वे रेनार्ड यांनी प्रशिक्षकांच्या भूमिकेमध्ये साैदी अरब फुटबाॅल टीममधील युवा खेळाडूंना दिला आहे. त्यामुळे मेहनतीच्या बळावर साैदी अरेबिया टीमच्या खेळाडूंचा कामगिरीचा दर्जा उंचावलेला आहे. यामुळेच संघाला सनसनाटी विजयाची नाेंद करून विश्वचषकातील आपल्या माेहिमेला दिमाखदारपणे चांगली सुुुरुवात करता आली. संघाचे प्रशिक्षक रेनार्ड हे प्रचंड शिस्तीचे आहेत. त्यामुळेच दिलेल्या वेळेत वर्कआऊट करण्याचे प्रत्येक खेळाडूसमाेर टार्गेट असते. याशिवाय शरीर पूर्णपणे थरथर कापत नाही, ताेपर्यंत काेच रेनार्ड हे खेळाडूंकडून सराव करून घेतात. याच सरावामुळे सर्व खेळाडूंना दर्जेदार खेळीची शैली आत्मसात करता आली आहे. वेगवान चेंडूवर ताबा मिळवणे, अधिक वेळ आपल्याकडेच चेंडू राखून ठेवणे, याेग्य पद्धतीच्या समन्वयातून चेंडू पास करण्याची शैली त्यांनी खेळाडूंना शिकवली आहे. याशिवाय ते आपल्या खेळाडूंना सर्वाेत्तम आहार देण्यावर अधिक भर देतात. याशिवाय जिममध्ये सर्वांकडून मेहनत करून घेण्याचा त्याचा आग्रह असताे.

बातम्या आणखी आहेत...