आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आशिया चषक:नसीमच्या शेवटच्या षटकातील 2 षटकारांनी पाक विजयी

शारजाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानने आशिया चषकातील सुपर ४ च्या रोमहर्षक सामन्यात अफगाणिस्तानचा एक गडी राखून पराभव केला. या निकालामुळे अफगाणिस्तानसह भारतही आशिया चषकाच्या बाहेर झाला आहे. पाकिस्तानच्या आधी श्रीलंकेने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अफगाणिस्तानने ६ गडी गमावून १२९ धावा केल्या होत्या. पाकिस्तानने ठराविक अंतराने गडी गमावले.

शेवटच्या ३ षटकांत त्यांना २५ धावा हव्या होत्या. ५ गडी शिल्लक होते. १८ व्या आणि १९ षटकात अफगानने पाकचे २-२ गडी टिपून सामना आपल्या बाजूने झुकवला. शेवटच्या षटकात पाकिस्तानला विजयासाठी ११ धावांची गरज होती. फझल हक फारूकीच्या या षटकात पहिल्या दोन चेंडूंवर नसीम शाहने दोन षटकार ठोकून पाकिस्तानला अंतिम फेरीत पोहोचवले.

बातम्या आणखी आहेत...