आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Sports
 • 20 Clubs Lose 10,000 Crores If United League Does Not Have Remaining Season

फुटबॉल:लीगचे उर्वरित सत्र न झाल्यास 20 क्लबचे 10 हजार कोटींचे नुकसान, युनायटेड सिटीला माेठा फटका

लंडन3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
 • कॉपी लिंक
जर्मनीच्या सर्वच क्लबचा सराव सुरू - Divya Marathi
जर्मनीच्या सर्वच क्लबचा सराव सुरू
 • कोरोना व्हायरसमुळे फुटबॉलच्या अर्थकारणावर परिणाम : क्लबला टीव्ही व सामन्यांच्या कमाईचे नुकसान होणार
 • युनायटेड क्लबला सर्वात माेठा १०८० काेटींच फटका

कोरोना व्हायरसमुळे सर्व क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. युरोपियन फुटबॉलच्या पाच प्रमुख लीग मार्चपासून स्थगित आहेत. त्या सुरू होण्याची अाशा कमी आहेत. सर्वाधिक कमाई करणारी इंग्लंडची प्रीमियर लीग एप्रिलपर्यंत स्थगित केली आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये स्टेक होल्डर्सना चालू सत्र होईल की नाही, याबाबत शंका आहे. सध्या लीगमधील सर्व २० संघांचे ९-१० सामने बाकी आहेत. जर लीगचे उर्वरित सत्र रद्द केले तर त्यांच्या क्लबच्या कमाईत मोठी घसरण होईल. त्यांना १.०८ बिलियन पाऊंड म्हणजे १० हजार ७७ कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकते. सर्वाधिक  तोटा मँचेस्टर युनायटेडला होऊ शकतो. त्यांना ११६.४ मिलियन पाऊंड म्हणजे जवळपास १०८० कोटी रुपयांचा फटका बसू शकतो. 

 • क्लबला टीव्ही, मॅच, कमर्शियल, रिटेल रेव्हेन्यूमधून माेठे नुकसान
 • नॉर्विचचे सर्वात कमी १८३ काेटी रुपयांचे नुकसान हाेऊ शकेल
 • गुणतालिकेत लिव्हरपूल ८२ गुणांसह अव्वल; सिटी (५७) दुसऱ्या स्थानावर

दोन्ही मँचेस्टर क्लब आपल्या कर्मचाऱ्यांना संपूर्ण वेतन देत आहेत

नुकतीच एक बातमी आली होती की, लॉकडाऊनमुळे प्रीमियर लीगचे काही क्लब आपल्या कर्मचाऱ्यांना वेतन देणार नाही किंवा त्यांचे वेतन कमी करतील. लिव्हरपूलने म्हटले होते की, ते न खेळणाऱ्या कर्मचाऱ्यांना तात्पुत्या सुटीवर पाठवणार आहेत, कारण वेतन देणे लागू नये. त्यानंतर लीगमध्ये अव्वल असलेल्या क्लब लिव्हरपूलने सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या योजनेनुसार ८० टक्के वेतन देण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे, मँचेस्टरच्या दोन्ही क्लबने सिटी व युनायटेड आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना संपूर्ण वेतन देत आहेत. आर्सेनलने देखील एप्रिलचे संपूर्ण वेतन देण्याचा निर्णय घेतला.

जर्मनीच्या सर्वच क्लबचा सराव सुरू

 • कोराेना व्हायरस महामारीनंतर पहिल्यांदा मंगळवारी जर्मनीच्या सर्वच फुटबाॅल क्लबने सरावाला सुरुवात केली. १३ मार्चपासून लीगचे सामने झाले नाही.
 • टीममधील सर्वच खेळाडू हे छाेट्या छाेट्या ग्रुपच्या माध्यमातून सराव करताना दिसतात. त्यामुळे बाधा हाेण्याचा धाेका नसल्याची त्यांची प्रतिक्रीया अाहे.
बातम्या आणखी आहेत...