आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • 20 day Break For Team India; Biobubble Will End, Test Against England From 4 August

बायोबबल:टीम इंडियाला 20 दिवसांचा ब्रेक; बायोबबलचा फुगाही फुटणार, 4 ऑगस्टपासून इंग्लंडविरुद्ध कसोटी

लंडन12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • न्यूझीलंडविरुद्ध टेस्ट चॅम्पियनशिप फायनलनंतर मिळणार माेठा ब्रेक

येत्या १८ जूनपासून भारत अाणि न्यूझीलंड यांच्यात टेस्ट चॅम्पियनशिप फायनलला सुरुवात हाेणार अाहे. जागतिक दर्जाच्या या फायनलनंतर निश्चितपणे भारतीय संघाचे खेळाडू हे मानसिकदृष्ट्या थकलेले असतील. त्यामुळे भारतीय संघाला या फायनलनंतर २० दिवसांचा ब्रेक दिला जाणार अाहे. टीमच्या सर्व खेळाडूंना मानसिकदृष्ट्या विश्रांती मिळावी, यासाठी टेस्ट चॅम्पियनशिप फायनलनंतर ब्रेक देण्याचा निर्णय घेण्यात अाला. यातून टीमच्या खेळाडूंना बायाेबबलमधून बाहेर पडण्याची संधी अाहे. भारत अाणि न्यूझीलंड यांच्यात १८ ते २२ जून दरम्यान फायनल रंगणार अाहे. त्यानंतर भारतीय संघ २० दिवसांचा ब्रेक घेऊ शकेल. या दीर्घ विश्रांनीनंतर टीम इंडिया ४ अाॅगस्टपासून यजमान इंग्लंडविरुद्ध कसाेटी मालिकेसाठी मैदानावर उतरणार अाहे. भारत अाणि यजमान इंग्लंड यांच्यात पाच कसाेटी सामन्यांची मालिका हाेणार अाहे. या मालिकेतील सलामीची कसाेटी ४ अाॅगस्टला नाॅटिंगहॅममध्ये सुरू हाेईल.

१० अाॅक्टाेबरपूर्वी अायपीएल सामने संपवण्याचे अाव्हान!

बीसीसीआय आयपीएल २०२१ च्या उर्वरित सत्रातील अंतिम सामना १५ ऑक्टोबर रोजी घेऊ इच्छिते. सामन्यांची सुरुवात १९ सप्टेंबर रोजी होईल. मंडळाला मोठा कालावधी हवा आहे, कारण डबल हेडर कमी खेळावे लागतील. सूत्रांनुसार आयसीसी त्याला परवानगी देणार नाही. एका अधिकाऱ्याने म्हटले की,‘टी-२० विश्वचषक १८ ऑक्टोबर रोजी सुरू होऊ शकते. आयपीएल १५ ऑक्टोबरपर्यंत घेता येऊ शकते? अशा प्रकारचा दोन स्पर्धांचा संघर्ष आयसीसी होऊ देणार नाही. त्याचबरोबर, विश्वचषकात खेळणारे संघ आपल्या खेळाडूंना १५ ऑक्टोबरपर्यंत खेळण्याची परवानगी देऊ शकतात.’

सदस्य व आयसीसीचा अलिखित करार आहे की, आयसीसीच्या स्पर्धेपूर्वी ७-१० दिवस आधी इतर कुठल्याही स्पर्धेचे नियोजन नसावे. दुसरीकडे, बीसीसीआय विश्वचषकाचे यजमानपद श्रीलंकेला देऊ शकत नाही. कारण, बीसीसीआयकडे स्पर्धेचे यजमानपद बदलण्याचा अधिकार नाही. आयसीसी अशा पर्यायांचा विचारदेखील करत नाही. त्यामुळे नवा पेच निर्माण हाेऊ शकताे.

ब्रेक गरजेचा; अायपीएलसह वर्ल्डकपचे सामने हाेणार
टेस्ट चॅम्पियनशिप फायनलनंतर भारतीय संघाला मिळणारा २० दिवसांचा ब्रेक हा फार महत्त्वाचा अाणि गरजेचा अाहे. या ब्रेकमुळे खेळाडूंना विश्रांती मिळेल. त्यानंतर टीम इंडियाचे खेळाडू हे अायपीएलचे उर्वरित सामने अाणि विश्वचषकाच्या सामन्यांसाठी मैदानावर उतरणार अाहेत.

कुटुंबीयांसाेबत माैजमजा करण्याची सर्वांना संधी
फायनलनंतर भारतीय संघाला अाम्ही २० दिवसांचा ब्रेक देण्याचा निर्णय घेतला अाहे. ब्रेकदरम्यान टीम इंडियाच्या खेळाडूंना अापल्या कुटुंबीयांसमवेत इंग्लंडमध्येच माैजमजा करता येणार अाहे. यादरम्यान ते अापल्या मित्र परिवाराचीही भेट घेऊ शकणार अाहेत. यासाठी त्यांना सर्व काही सूट देेण्यात अाली, अशी प्रतिक्रिया बीसीसीअायच्या सुत्रांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...