आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा३६० डिग्री शॉट्स खेळणारा भारतीय फलंदाज सूर्यकुमार यादवच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये २००% वाढ झाली आहे. टी-२० विश्वचषकात शानदार फलंदाजी करणाऱ्या सूर्याला जगभरात प्रचंड मागणी आहे. टॅलेंट मॅनेजमेंट एजन्सीनुसार, सूर्याची मागणी इतकी वाढली आहे की, त्याची दैनंदिन जाहिरात शुल्क जवळपास २०० टक्क्यांनी वाढले आहे. ६ ते ७ ब्रँड्स सूर्याला त्यांचा नवीन ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून घोषित करण्याच्या तयारीत आहेत.
यामध्ये शीतपेये, मोबाइल अॅक्सेसरीज, मीडिया, स्पोर्ट््स आणि कॅज्युअल पोशाख, शिक्षण, परदेशी सेवा यांचा समावेश आहे. आयपीएलपूर्वी सूर्या दररोज सुमारे २० लाख रुपये आकारत होता, परंतु आता तो ब्रँड जाहीरात फीमधून दररोज ६५ ते ७० लाख रुपये कमवत आहे. त्याचबरोबर, ब्रँड्सचा विचार केला, तर आयपीएलपूर्वी सूर्या फक्त ४ ब्रँडची जाहीरात करत होता. परंतु टी-२० विश्वचषकातील त्याच्या कामगिरीनंतर ब्रँडची संख्या २० पर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.
सूर्याने फलंदाजी क्रमवारीत, हसरंगा गोलंदाजीत अव्वलस्थानी सूर्यकुमार टी-२० फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानावर कायम आहे. तो ८६९ गुणांसह प्रथमस्थानी आहे. सूर्याने टी-२० विश्वचषकात पाच सामन्यांमध्ये २०० च्या जवळपास स्ट्राइक रेटने २२५ धावा केल्या आहेत. भारताचा उपकर्णधार केएल राहुल १६ व्या, विराट कोहली ११ व्या आणि रोहित शर्मा १८ व्या स्थानावर आहे. गोलंदाजीत श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा ७०४ गुणांसह अव्वल स्थानावर पोहोचला. अफगाणिस्तानच्या राशिद खानला मागे टाकत त्याने हे स्थान गाठले. अर्शदीप सिंग करिअरमधील सर्वोत्तम २३ व्या क्रमांकावर पोहोचला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.