आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • 200+ Score For The First Time This Year For Hosts Gujarat, 29 Runs Needed In 6 Balls, Rinku's Five Consecutive Winning Sixes

IPL:यजमान गुजरात संघाची यंदा पहिल्यांदाच 200+ धावसंख्या, 6 चेंडूंत 29 धावांची गरज असताना रिंकूचे सलग पाच विजयी षटकार

अहमदाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 6 चेंडूंत 29 धावांची गरज असताना रिंकूचे सलग पाच विजयी षटकार

सामनावीर रिंकू सिंगने (२१ चेंडूंत नाबाद ४८ धावा) तुफानी खेळीतून काेलकाता नाइट रायडर्स संघाला रविवारी आयपीएलमध्ये राेमांचक विजय मिळवून दिला. गुजरातविरुद्ध सामन्यात शेवटच्या षटकांत विजयासाठी २९ धावांची गरज असताना रिंकू सिंगने सलग पाच षटकार खेचले. यास त्याने काेलकाता संघाला अविस्मरणीय असा विजय मिळवून दिला. याच झंझावाती खेळीच्या बळावर काेलकाता संघाने आयपीएलच्या सामन्यात यजमान गुजरात टायटन्स टीमवर ३ गड्यांनी मात केली. यासह नितीश राणाच्या नेतृत्वाखाली काेलकाता संघाने लीगमध्ये सलग दुसऱ्या विजयाची नाेंद केली.

साई सुदर्शन (५३) आणि विजय शंकरच्या (६३) खेळीच्या बळावर गुजरात संघाने प्रथम फलंदाजी करताना ४ बाद २०४ धावा काढल्या. प्रत्युत्तरात काेलकाता संघाने ७ गड्यांच्या माेबदल्यात राेमहर्षक विजय साजरा केला. संघाच्या विजयामध्ये व्यंकटेश अय्यरने (८३) अर्धशतकाचे माेलाचे याेगदान दिले. तसेच युवा खेळाडू रिंकूने नाबाद ४८ आणि कर्णधार नितीश राणाने ४५ धावांची खेळी केली.

धवनच्या नाबाद ९९ धावा व्यर्थ; यजमान हैदराबादची पंजाबवर मात
दिव्य मराठी नेटवर्क | हैदराबाद

फाॅर्मात असलेल्या कर्णधार शिखर धवनने पंजाब किंग्ज संघाकडून रविवारी आयपीएलमध्ये यजमान हैदराबाद संघाविरुद्ध नाबाद ९९ धावांची झंझावाती खेळी केली.मात्र, राहुल त्रिपाठी (७४) आणि मयंक मारकंडेने (४/१५) शानदार खेळीतून यजमान हैदराबादचा विजय साजरा करत धवनची खेळी व्यर्थ ठरवली. हैदराबाद संघाने लीगमध्ये आपल्या तिसऱ्या सामन्यात पंजाबवर ८ गड्यांनी मात केली. यजमान हैदराबाद संघाने १७.१ षटकांत लीगमधील पहिला विजय साजरा केला. सलगच्या दाेन पराभवानंतर हैदराबादला आता विजयाचे खाते उघडता आले. पंजाबने प्रथम फलंदाजी करताना ९ गड्यांच्या माेबदल्यामध्ये यजमान सनरायझर्स हैदराबाद टीमसमाेर विजयासाठी १४४ धावांचे टार्गेट ठेवले. प्रत्युत्तरात हैदराबाद संघाने २ गमावत विजयाचे लक्ष्य यशस्वीपणे गाठले.
धवनची सत्रात माेठी खेळी; १२ चाैकार व ५ षटकार : शिखर धवनने तुफानी खेळी करताना १२ चाैकार व ५ षटकार खेचले. त्याने ६६ चेंडूंमध्ये नाबाद ९९ धावांची खेळी साकारली. यासह त्याने सत्रात माेठी खेळी केली.

04 वेळा लीगमध्ये षटकात पाच षटकार
160 वा सामना नरेनने काेलकाता संघाकडून.

हार्दिक आजारी; राशिदकडे नेतृत्व
गत चॅम्पियन गुजरात टायटन्स संघाचा नियमित कर्णधार हार्दिक पंड्या रविवारी आजारी हाेता. यामुळे यजमान गुजरात संघाच्या नेतृत्वाची धुरा राशिद खानकडे साेपवण्यात आली. राशिदने कुशल नेतृत्वासह लक्षवेधी गाेलंदाजी केली. त्याने सामन्यात विकेटची हॅट््ट्रिक साजरी केली. यासह ताे यंदा लीगमध्ये पहिला हॅट््ट्रिकवीर गाेलंदाज ठरला. त्याने रसेलसह व नरेन आणि शार्दूलला सलग बाद केले.