आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिरंदाजी स्‍पर्धा:तिरंदाजी स्पर्धेत 201 खेळाडूंचा सहभाग

औरंगाबाद13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय क्रीडा प्राधिकरण औरंगाबाद (साई) येथे पश्चिम विभागीय दुसऱ्या खेलो इंडिया तिरंदाजी स्पर्धेला शुक्रवारी सुरुवात करण्यात आली. या स्पर्धेत एकूण २०१ खेळाडूंनी सहभाग घेतला. यात ११३ खेळाडू रिकर्व्ह प्रकारात आणि ८८ खेळाडू कंपाउंड प्रकारात मैदानात उतरले आहेत. त्याचबरोबर ११३ महिला खेळाडू रिकर्व्ह प्रकारात आणि २२ खेळाडू कंपाउंड प्रकारात सहभागी होतील. स्पर्धेचे उद्घाटन उत्पादन शुल्क विभागाचे एसी संतोष झगडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी औरंगाबाद साईचे उपसंचालक नितीनकुमार जैस्वाल यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन औरंगाबाद जिल्हा धनुर्विद्या संघटनेचे सचिव लक्ष्मीकांत खिची यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...