आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • 2011 Cricket World Cup Final Fixing Case Investigation, Sri Lanka Captain Kumar Sangakkara Mahela Jayawardene News Updates

2011 वर्ल्ड कप फिक्सिंग प्रकरण:पुराव्या अभावी श्रीलंकन पोलिसांनी चौकशी केली बंद; 3 दिवसात माजी कर्णधार संगकारा, डी सिल्वा आणि ओपनर थरंगाची चौकशी

स्पोर्ट डेस्क2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • श्रीलंका पोलिसांनी कुमार संगकाराची 10 आणि अरविंद डी सिल्वाची 6 तास चौकशी केली

श्रीलंका पोलिसांनी 2011 वर्ल्ड कप फायनलमधील कथित फिक्सिंग प्रकरणाच्या चौकशीला शुक्रवारी बंद केले. 3 दिवसात पोलिसांनी वर्ल्ड कपमध्ये  श्रीलंकन संघाचा कर्णधार राहिलेला कुमार संगकारा, चीफ सिलेक्टर अरविंद डी सिल्वा आणि उपुल थरंगाची चौकशी केली. यादरम्यान, पोलिसांना फिक्सिंगचा पुरावा मिळाल नाही. ओपनर थरंगाने फायनलमध्ये 20 बॉलवर 2 रन काढले होते.

2011 मध्ये रेल्वे मंत्री राहिलेले महिंदानंदा अलुथगामागे यांच्या आरोपानंतर स्पेशल टीमला चौकशी करण्याची जबाबदारी दिली होती. महिंदानंद यांनी श्रीलंका क्रिकेट बोर्डाला 24 कारणांची एक लिस्टही दिली होती. महिंदानंदा यांच्यासह माजी कर्णधार सनथ जयसूर्यानेही फायनल सामन्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

खेळाडूंची चौकशी करण्याचे कोणतेच कारण नाही

चौकशी करणाऱ्या टीमचे इंचार्ज पोलिस अधीक्षक जगत फोन्सेका म्हणाले, ‘‘स्पोर्ट्स मिनिस्ट्रीने चौकशीचे आदेश दिले आहेत, आम्ही त्यांना आमची रिपोर्ट पाठवली आहे. सर्व बाजुने चौकशी केल्यानंतर आम्ही ही रिपोर्ट तयार केली आहे. खेळाडूंची पुढे चौकशी करावी, असे एकही कारण आम्हाला सापडले नाही. रिपोर्टमध्ये तीन खेळाडूंचा जबाब नोंदवण्यात आला आहे.’’

चाहत्यांनी संगकाराच्या चौकशीचा विरोध केला

मंगळवारी डी सिल्वाची 6 तास चौकशी झाली. यानंतर उपुल थरंगाची चौकशी झाली. त्यानंतर पोलिसांनी गुरुवारी माजी कर्णधार संगकाराची 10 तास चौकशी केली. यावर श्रीलंकेतील क्रिकेट चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांचे म्हणने आहे की, चुकीचे आरोप लावून खेळाडूंना त्रास दिला जात आहे.

बातम्या आणखी आहेत...