आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायंदा कतारमध्ये काेणता संघ फुटबाॅलच्या विश्वातील जगज्जेता ठरताे, याकडेच जगभरातील चाहत्यांचे लक्ष लागले आहे. उद्या रविवारी हे निश्चित हाेणार आहे. याच जगज्जेतेपदाची माळ आपल्या गळ्यात घालण्यासाठी मेसीचा अर्जेंटिना आणि एमबापेचा फ्रान्स संघ रविवारी फायनलमध्ये समाेरासमाेर असतील. याच सामन्यातील निकालानंतर लगेच २०२६ मध्ये हाेणाऱ्या फिफा वर्ल्डकपच्या आयाेजनाचे वेध लागणार आहेत. कारण, संयुक्तमध्ये तीन देशांमध्ये या २०२६ फिफा विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेचे आयाेजन केले जाणार आहे. यामध्ये कॅनडा, मेक्सिकाे आणि अमेरिकेचा समावेश आहे. ही २०२६ मधील फुटबाॅल स्पर्धा नव्या स्वरूपात खेळवली जाणार आहेे. यादरम्यान वर्ल्ड चॅम्पियन हाेण्यासाठी जगभरातील जवळपास ४८ फुटबाॅल संघ या स्पर्धेत सहभागी हाेतील. पहिल्यांदाच ही संघ संख्या वाढणार आहे. १९९८ पासून आजतागायत ३२ संघ सहभागी झाले.
फाॅरमॅटची अडचण: २ फाॅरमॅटवर सध्या तज्ज्ञांनी आपापली मते मांडली पुढच्या विश्वचषकामध्ये ४८ संघ सहभागी हाेणार आहेत. त्यामुळे आता फिफासमाेर फाॅरमॅटची माेठी अडचण निर्माण झाली आहे. तज्ज्ञांच्या मते दाेन फाॅरमॅट तयार केले जाऊ शकतात.
1. पहिल्या फाॅरमॅटनुसार प्रत्येकी ४ संघांचे एकूण १२ गट तयार केले जाऊ शकतील. प्रत्येक गटातील अव्वल दाेन संघांना बाद फेरीसाठी पात्र ठरतील. त्यानंतर यातील आठ संघ पुढच्या फेरीत प्रवेश करतील.यासाठी गाेलच्या अंतराचाही नियम महत्त्वाचा ठरेल.
2. फिफाने सध्या एक फाॅरमॅट डाेळ्यासमाेर ठेवला आहे. त्यानुसार प्रत्येकी ३ संघांचे एकूण १६ गट तयार केले जाणार आहेत. प्रत्येक संघ तीन सामने खेळेल. त्यानंतर प्रत्येक गटातून अव्वल दाेन संघ हे बाद फेरीसाठी पात्र ठरतील. यामुळे ग्रुप स्टेजचा शेवटचा टप्पा निरर्थक हाेऊ शकताे.
पुढच्या विश्वचषकात युराेपचे फक्त ३ संघ; आशिया खंडातून आठ संघांना सहभागी हाेण्याची संधी २०२६ मधील फिफा विश्वचषकामध्ये ४८ संघ सहभागी हाेतील. मात्र, यामध्ये युराेपियन फक्त तीनच संघ खेळताना दिसणार आहेत. आता आशिया खंडातून आठ संघांना विश्वचषकाची संधी मिळेल.
खंडातील प्रतिनिधित्व खंड पहिले 2026 आशिया 4.5 8 आफ्रिका 5 9 उत्तर/मध्य अमेरिका 3.5 6 खंड पहिले 2026 दक्षिण अमेरिका 4.5 6 ओसियाना 0.5 1 युरोप 13 16
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.