आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यूएस ओपन:21 वर्षीय  स्वातेक महिला चॅम्पियन; किताब विजेती पाेलंडची पहिली

मॅथ्यू फॅटरमॅन21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

यंदाच्या सत्रातील शेवटची ग्रँडस्लॅम अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा खऱ्या अर्थाने सर्वांसाठी अविस्मरणीय ठरणारी आहे. कारण, याच स्पर्धेतून सर्वाधिक २३ ग्रँडस्लॅम चॅम्पियन सेरेनाने टेनिसच्या वि‌श्वाला अलविदा केले आणि पाेलंडच्या २१ वर्षीय इगा स्वातेकने महिला एकेरीच्या गटात ग्रँडस्लॅम चॅम्पियन हाेण्याचा बहुमान पटकावला. स्वातेक ही अमेरिकन ओपनमध्ये एकेरीचा किताब जिंकणारी पाेलंडची पहिली महिला टेनिसपटू ठरली. पाेलंडच्या या युवा टेनिसपटूने शनिवारी मध्यरात्री ऑर्थर एेश स्टेडियमच्या टेनिस काेर्टवर ट्युनिशियाच्या ओंस जेंबुरला सरळ दाेन सेटमध्ये धूळ चारली. जगातील नंबर वन स्वातेकने ६-२, ७-६ अशा फरकाने राेमहर्षक विजय संपादन केला. यासह तिने करिअरमध्ये तिसरा ग्रँडस्लॅम आणि क्ले काेर्ट वगळता इतर सरफेसवरील पहिला ग्रँडस्लॅम किताब जिंकला आहे.

-आयाेजकांच्या वतीने ट्राॅफीमध्ये आवडीची तिरामिसू मिठाई ठेवून स्वातेकला सरप्राइज दिले. -चॅम्पियन स्वातेकचा ट्राॅफी व २०.७ काेटींचे बक्षीस देऊन गाैरव. - स्वातेकने यंदा मार्च-एप्रिलमध्ये इंडियन वेल्स व मियामी ओपन किताब जिंकला.

बातम्या आणखी आहेत...