आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जपानची २२ वर्षीय टेनिसपटू नाओमी ओसाका जगात सर्वाधिक कमाई करणारी महिला खेळाडू झाली आहे. फोर्ब्ज मासिकानुसार, ओसाकाने वर्षभरात बक्षिसाची रक्कम व जाहिरातीतून २८४ कोटी रुपये (३.७४ कोटी डॉलर) कमावले, जे अमेरिकेची खेळाडू व चार वेळा सर्वाधिक कमाई करणाऱ्या सेरेना विल्यम्सपेक्षा सुमारे ११ कोटी रुपये (१४ लाख डॉलर) जास्त आहे. ओसाकाची कमाई कुठल्याही महिला खेळाडूद्वारे वर्षभरात केलेल्या कमाईच्या तुलनेत सर्वाधिक आहे. विशेष म्हणजे सेरेनाने १९९९ मध्ये आपला पहिला ग्रँडस्लॅम किताब पटकावला तेव्हा नाओमी केवळ एक वर्षाची होती. १९ वर्षांनंतर ओसाकाने विल्यम्सला पराभूत करून ग्रँडस्लॅम जिंकला होता. यादी येत्या आठवड्यात जाहीर होईल.
आयपीएल रद्द झाली तर ९ देशांतील १८८ खेळाडूंना ६१२ कोटी रु.चे नुकसान
कोरोनामुळे इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्थगित करण्यात आली आहे. खेळ रद्द झाल्यास ९ देशांतील १८८ खेळाडूंना ६१२.६५ कोटी रुपयांचे नुकसान होईल. भारतानंतर सर्वाधिक नुकसान ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचे होईल.
सर्वाधिक नुकसान होणारे अव्वल ६ देश
देश रक्कम (कोटी रु.त)
भारत : ३५८.५५
ऑस्ट्रेलिया : ८६.७५
वेस्ट इंडीज : ५८.७५
इंग्लंड : ४७.५०
दक्षिण आफ्रिका : ३४.६०
अफगाणिस्तान : १४.००
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.