आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • 2.35 Crore Fans Apply For FIFA World Cup Tickets, Argentina The Most; Viewership Up To 500 Crores! |marathi News

फिफा वर्ल्डकप:तिकिटासाठी तब्बल 2.35 कोटी चाहत्यांचे अर्ज, सर्वाधिक अर्जेंटिनाचे; 500 कोटींपर्यंत व्ह्यूअरशिप!

दुबई23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 21 नोव्हेंबरपासून कतारमध्ये विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन

फिफाच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचा थरार यंदाच्या सत्रातील शेवटी नोव्हेंबर-डिसेंबरदरम्यान रंगणार आहे. कतारमध्ये २१ नोव्हेंबरपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. फिफाच्या याच विश्वचषकासाठी फुटबॉलप्रेमींमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळेच या वर्ल्डकप सामन्यांचा स्टेडियममध्ये बसून आनंद लुटण्यासाठी जगभरातील २.३५ कोटी फुटबॉलप्रेमी उत्सुक आहेत. या सर्वांनी तिकिटासाठी अर्ज केले आहेत. यामध्ये लियोनेल मेसीच्या राष्ट्रीय संघ अर्जेंटिनामधील सर्वाधिक चाहत्यांचा समावेश आहे. त्यापाठोपाठ ब्राझील, इंग्लंड, फ्रान्स, मेक्सिको, अमेरिकन चाहत्यांचा सहभाग आहे. त्यामुळे यादरम्यान चाहत्यांचा मोठा उत्साह स्टेडियममध्ये पहायला मिळणार आहे.

कतारला पहिल्यांदाच फिफाच्या जगातिक दर्जाच्या फुटबॉल स्पर्धेच्या आयोजनासाठी यजमानपदाचा बहुमान मिळाला आहे. त्यामुळे या २८ दिवस रंगणाऱ्या फुटबॉल स्पर्धेच्या आयोजनाची तयारीही आता शेवटच्या टप्प्यात आहे. कतारने भव्य स्वरूपात या स्पर्धेचे आयोजन केले आहे. याची फायनल १८ डिसेंबर रोजी रंगणार आहे. लुसालेमध्ये आयोजित फायनलच्या तिकिटासाठी ३० लाख चाहत्यांनी अर्ज केले आहेत. याशिवाय चाहत्यांनी अर्जेटिना, इंग्लंड, फ्रान्स, ब्राझील आणि अमेरिका संघांच्या सामन्यादरम्यानही तिकीट बुकिंगला पसंती दर्शवली आहे. यातील फायनलदरम्यानची चाहत्यांची संख्याही मोठी आहे. कतारमध्ये पहिल्यांदाच या मोठ्या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे.

गतवेळच्या तुलनेत व्ह्यूअरशिपमध्ये होणार वाढ
गतवेळच्या तुलनेत यंदा कतारमधील फिफा वर्ल्डकपदरम्यान व्हूअरशिपमध्ये झपाट्याने वाढ होणार आहे. माध्यमतज्ज्ञांच्या मते, कतारमध्ये विश्वचषकादरम्यान जगभरातील जवळपास ५०० कोटी चाहते हजेरी लावतील. म्हणजेच या स्पर्धेच्या व्ह्यूअरशिपमध्ये गतवेळच्या तुलनेत अडीच पटीने वाढ होईल. रशियातील २०१८ मधील स्पर्धेदरम्यान ३.५ कोटी चाहत्यांची उपस्थिती होती. या स्पर्धेच्या प्रसारण हक्कासाठी फॉक्सने जवळपास ३१०० कोटी रुपये खर्च केले आहेत.

बातम्या आणखी आहेत...