आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विश्लेषण:कतार विश्वचषकात 24% अनपेक्षित निकाल; अनुभवावर विश्वास दाखवला

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • २००२ नंतर या विश्वचषकात सर्वात कमी १४५८ शॉट्स मारले, एका गोलसाठी २२.८ शॉट मारले

फिफा विश्वचषक संपल्यानंतरही चाहते या विश्वचषकावर बोलण्यापासून अद्यापही स्वत:ला रोखू शकत नाहीत. त्यामध्ये अनेक कारणे आहेत. या विश्वचषकात लोकांनी अापल्या हीरोला खेळताना पाहिले आहे. काही खेळाडू विश्वचषकात अखेरच्या वेळी, तर काही खेळाडू प्रथम उतरले हाेते. कुणी आपल्या खेळाडूचे शेवटचे खेळणे पाहिले, तर काहींनी प्रथमच खेळताना पाहिले. या विश्वचषकादरम्यान अनेक विक्रम रचले गेले, तर काही तुटले. कतार विश्वचषकात नवा ट्रेंड पाहायला मिळाला. या विश्वचषकात अनेक सामन्याचे निर्णय पेनल्टी शूटआऊटवर ठरले, त्यात अंतिम सामन्याचाही समावेश आहे. धक्कादायक निकालाची सुरुवात अर्जेंटिना व सौदी अरेबिया यांच्या सामन्याने झाली, ती स्पर्धेच्या बाद फेरीपर्यंत चालली. पाहूयात विश्वचषक २०२२ मधील काही ट्रेंड्स..

१९५८ नंतर प्रथमच यंदा सर्वाधिक धक्कादायक निकाल
फिफा विश्वचषकात १९५८ नंतर सर्वाधिक धक्कादायक निकाला लागले. आकडेवारीनुसार, या वर्षी २४% सामन्यात अनपेक्षित निकाला लागले, तर २००२ मध्ये २२% निकाल अनपेक्षित पहायला मिळाले. ते निकाल यावर्षी सरासरी दोन टक्के अधिक आहे.

वर्ष अनपेक्षित %
2022 24%
2002 22%
2010 19%
2018 19%
1990 17%

या वर्षी इतिहासात सर्वाधिक गोल
कतार विश्वचषक २०२२ मध्ये विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक गोल (१७२) झाले. असे असूनही २००२ नंतर या विश्वचषकात सर्वात कमी १४५८ शॉट मारले गेले. याचा अर्थ या वर्षी गोल करण्यासाठी शॉट्सची सरासरी २२.८ होती. एक गोल करण्यासाठी २२.८ शॉट्स मारले गेले. तसेच, या वेळी सामन्यातील गोलची सरासरी २.६९ होती, जी १९९४ च्या २.७१ नंतरची सर्वोत्तम ठरली आहे.

सर्वाधिक पेनल्टी व कमी फाउल्स
विश्वचषक २०२२ मध्ये एकूण २३ पेनल्टी देण्यात आल्या होत्या. विश्वचषकातील पहिले आणि शेवटचे गोल पेनल्टीवर झाले, जे २०१८ च्या विश्वचषकापेक्षा कमी होते. यावर्षी कमी फाऊल झाले, हे त्याचे एक कारण आहे. यावर्षी १५९९ फाऊल देण्यात आले, जे गेल्या पाच स्पर्धेमधील सर्वात कमी आहे. तसेच २३ पेनल्टीपैकी २६% गोल झाले नाहीत. अर्जेंटिनाच्या ेसीने सर्वाधिक ५ पेनल्टी घेतल्या व ४ गोल केले. पोलंडविरुद्ध पेनल्टीवर गोल करण्यात तो अपयशी ठरला.

पेनल्टी शूटआऊट व स्टॉपेज वेळ
या वर्षी इतिहासातील सर्वाधिक सामने (५) शूटआऊटद्वारे निकाली निघाले. सुरुवातीच्या ५२ सामन्यांमध्ये एकही शूटआऊट सामना झाला नाही, पुढील १२ सामन्यांमध्ये ५ शूटआऊट झाले. अतिरिक्त वेळेत गेलेल्या सामन्यांमध्येही निकाल शूटआऊटवरच लागला. तसेच या विश्वचषकात सरासरी ११ मिनिटांचा अतिरिक्त वेळ दिला. जो २०१८ च्या विश्वचषकापेक्षा ६ मिनिटे जास्त आहे. आघाडीवरील संघाच्या वेळ वाया घालवण्याच्या रणनीतीला चाप लावला.

अनुभवी खेळाडूंवर संघाचा विश्वास
दबावाच्या परिस्थितीत संघ अनुभवी खेळाडूंवर अवलंबून होते. यंदा पेनल्टी शूटआऊटमध्ये ४१ शॉट्स घेण्यात आले, त्यापैकी २६ शॉट्स २५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या खेळाडूंनी घेतले. ३६% (१५) शॉट्स २५ किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या खेळाडूंनी घेतले. ३६% पेनल्टी वाचवल्या किंवा खेळाडू चुकले. ३३% पेनल्टी चुकलेले २५ वर्षाखालील होते. तर, २५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या खेळाडूंनी ६७% पेनल्टी चुकवल्या.

बातम्या आणखी आहेत...