आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • 25 Thousand Spectators Came To Watch The Serbian Cup Football Semi final

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फुटबॉल:सर्बियन कप उपांत्य सामना पाहण्यासाठी आले 25 हजार प्रेक्षक; उत्साह पूर्वीचाच

बेलग्रेड9 महिन्यांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • युरोपात फुटबॉल मैदानावर 3 महिन्यांनंतर उत्साहवर्धक दृश्य

हाती झेंडे, मशाली आणि आपल्या संघांना प्रोत्साहन देत नाचणारे-ओरडणारे प्रेक्षक... असे दृश्य कोरोना महामारी सुरू होण्यापूर्वी युरोपातील फुटबॉल मैदानावर नेहमीचे होते. हाच उत्साह तीन महिन्यांनंतर परतला आहे. सर्बियातील बेलग्रेड मैदानावरील हे दृश्य आहे. सर्बियन कप फुटबॉल स्पर्धेत उपांत्य सामन्याच्या वेळी सुमारे २५ हजार प्रेक्षक आले. 

बेलग्रेड डर्बी नावाने प्रसिद्ध या उपांत्य सामन्यात गतविजेत्या एफके पार्टिझनने रेड स्टारला १-०ने पराभूत केले. पार्टिझनचा कर्णधार बिबरस नेचो याने ५८ व्या मिनिटाला गोल केला. विजयानंतर पार्टिझनचे खेळाडू व प्रेक्षकांनी एकच जल्लोष आणि आतषबाजी केली.

बातम्या आणखी आहेत...