आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराव्लासिच, ब्रोजोविच व पसालिचने अचूक गाेल करून गत उपविजेत्या क्राेएशिया संघाला साेमवारी फिफा विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेत राेमहर्षक विजय मिळवून दिला. क्राेएशिया संघाने पेनल्टी शूटआऊटमध्ये जपानला ३-१ ने धूळ चारली.
गाेलरक्षक लिवाकोविचने क्राेएशिया संघाचा दणदणीत विजय निश्चित केला. या विजयासह क्राेएशिया संघाने उपांत्यपूर्व फेरीतील आपला प्रवेश निश्चित केला.
निर्धारित वेळेत हा सामना १-१ ने बराेबरीत राहिला हाेता. जपानकडून डेजेन माइडाने (४३ वा मि.) आणि क्राेएशियाकडून इवान पेरेसिचने (५५ वा मि.) प्रत्येकी एक गाेल केला.
जपानची सुमार खेळी : शूटआऊटमध्ये जपानला सुमार खेळीचा फटका बसला. जपानकडून असानोने गाेल केला. यादरम्यान मिनामिनो, मितोमा आणि योशिदा अपयशी ठरले.
लिवाकोविच हीराे जपान शूटआऊट 1. मिनामिनो no 2. मिटोमा no 3. असानो yes 4. योशिदा no क्रोएशिया 1. व्लासिक yes 2. ब्रोज़ोविच yes 3. लिवाजा x 4. पासालिक yes
क्रोएशियाने गत ८ पैकी ७ सामने बाद फेरीत अतिरिक्त वेळेत पूर्ण केले पेनल्टी शूटआऊटमध्ये 3 शॉट राेखणारे तिघे 2006 रिकार्डो इंग्लंड 2018 सुबासिच डेन्मार्क 2022 लिवाकोविच जपान
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.