आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • 3 Goals In Six Minutes; Madrid 17 For The Final; Match Against Six time Champions Liverpool On 28 May

माद्रिद:सहा मिनिटांत 3 गोल;  माद्रिद 17 व्यांदा फायनलमध्ये; सहा वेळच्या चॅम्प लिव्हरपूलविरुद्ध २८ मे रोजी सामना

माद्रिद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सहा मिनिटांत तीन गोल करून रिअल माद्रिदने चॅम्पियन्स लीगची फायनल गाठली. अतिरिक्त वेळेत केलेल्या सर्वाेत्तम कामगिरीतून माद्रिदला करिअरमध्ये १७ व्यांदा अंतिम फेरीतील आपला प्रवेश निश्चित करता आला. रोड्रिगो (९०. ९०+१ वा मि.), करीब बेंझेमा (९५ वा मि.) यांनी गोल करून माद्रिदला विजय मिळवून दिला. १६ वेळच्या किताब विजेत्या माद्रिदने सेमीफायनलच्या दुसऱ्या लेगमध्ये गत उपविजेत्या मँचेस्टर सिटीचा पराभव केला. माद्रिदने ३-१ ने सामना जिंकला. माद्रिदने पहिला लेग ४-३ ने जिंकला हाेता. त्यामुळे आता माद्रिदने एकूण ६-५ गोलने फायनल गाठली. सिटीकडून रियाद मेहरेजने ७३ व्या िमनिटाला गोल केला.

तिसऱ्यांदा लिव्हरपूल-माद्रिद फायनल : चॅम्पियन्स लीगमधील सर्वात यशस्वी टीम म्हणून स्पॅनिशच्या रिअल माद्रिदची ओळख आहे. या क्लबच्या नावे विक्रमी १६ वेळा किताबाची नोंद आहे. आता याच क्लबची नजर १७ व्या विजेतेपदाकडे लागली आहे. यासाठी माद्रिद क्लब २८ मे रोजी मैदानावर उतरणार आहे. या सामन्यात लिव्हरपूल आणि माद्रिद संघ समोरासमोर असतील. यांच्यातील आतापर्यंतचा हा तिसरा अंतिम सामना आहे.

बातम्या आणखी आहेत...