आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

याॅट रेस:1158  किमीच्या रेसदरम्यान 3 तासांची शिफ्ट; वादळाचा धाेका दूर करण्यासही सज्ज

किमबाॅल लिव्हिंगस्टनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अँडू काेमांच्या याॅटने १७.५ किमीच्या वेगाने एका दिवसात ११ तास ५६.४८ सेकंदांत पूर्ण केली रेस

नजरेच्या शेवटच्या टाेकापर्यंत फक्त पाणीच पाणी. दरम्यान, वेगवान वाऱ्याचा धाेका आणि विरुद्ध दिशेने हवेला कापत सुसाट धावणाऱ्या याॅट. हे सर्व अंगावर शहारे आणणारे चित्र आहे सिडनी हाेबार्ट याॅट रेसमधील. या आव्हानात्मक परिस्थितीतही अँडू काेमांच्या याॅटने १७.५ किमीच्या वेगाने एका दिवसात ११ तास ५६.४८ सेकंदांत ही रेस पूर्ण केली. ऑस्ट्रेलियामध्ये दरवर्षी हाेणाऱ्या या ११५८ िकमीच्या रेसला २६ डिसेंबरपासून सुरुवात झाली. यामध्ये १०९ याॅट सहभागी झाले आहेत.

नेविगेटरचे संकेत महत्त्वाचे सिडनी हाेबार्ट याॅट रेस ही जगातील दुसरी आव्हानात्मक रेस मानली जाते. या रेसदरम्यान याॅटच्या क्रू मेंबर्सला प्रत्येकी तीन तासांची शिफ्ट असते. लुईस नेविगेटर हे वादळ आणि इतर संकटाचे संकेत देत असते. त्यानुसार सर्व स्पर्धक हे आगेकूच करताना दिसतात.

बातम्या आणखी आहेत...