आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • 3 Medals For India In Weightlifting; Gold To Chanu, Silver To Sangli, Bronze To Pujari | Marathi News

राष्ट्रकुल स्पर्धा:वेटलिफ्टिंगमध्ये भारताला 3 पदके; चानूला सुवर्ण, सांगलीच्या संकेतला रौप्य, पुजारीला कांस्यपदक

बर्मिंगहॅम6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रकुल स्पर्धेत दुसऱ्या दिवशी भारताने जबरदस्त यश मिळवले. टोकियो ऑलिम्पिकमधील राैप्यपदक विजेत्या मीराबाई चानू हिने भारताला या स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. वेटलिफ्टिंगमध्ये 49 किग्रॅ वजन गटात चानू ने 201 किलो (स्नॅचमध्ये 88 आणि क्लीन अँड जर्क 113)वजन उचलले. हे तिचे सलग दुसरे सुवर्ण आहे. तिने 2018 च्या राष्ट्रकुल स्पर्धेतही सुवर्ण पटकावले होते. सांगलीचा वेटलिफ्टर संकेत महादेव सरगर याने 55 कि.गटात रौप्य पदक जिंकलेे. 61 कि.वजन गटात गुरुराजा पुजारी कांस्यपदकाचा मानकरी ठरला.

बातम्या आणखी आहेत...