आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • 3 Red Flags For The First Time In A Formula 1 Race; Max Verstappen Won The Trophy

दिव्य मराठी विशेष:फाॅर्म्युला-1 रेसमध्ये पहिल्यांदाच 3 वेळा रेड फ्लॅग; मॅक्स वर्सटापेनने जिंकली ट्राॅफी

मेलबर्न2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

यंदाच्या सत्रातील तिसरी फाॅर्म्युला वन रेस अधिक राेमांचक आणि वाद-विवादाने लक्षवेधी ठरली. मेलबर्नमध्ये रविवारी आॅस्ट्रेलियन ग्रांप्री एफ-वन रेस पार पडली. यादरम्यान मेलबर्नच्या सर्किटवर अनेक रेस कारला अपघात झाले. कार क्रॅशच्या कारणामुळे पहिल्यांदाच एफ-वन रेसदरम्यान तीन वेळा रेड फ्लॅग दाखवण्यात आला. त्यामुळे तीन वेळा या रेसला ब्रेक लागला. त्यानंतर सुरळीत झालेल्या या रेसमध्ये रेड बुलचा मॅक्स वर्सटापेन चॅम्पियन ठरला. त्याने २ तास ३२ मिनिट ३८.३७१ सेकंदामध्ये निश्चित अंतर गाठले. यासह ताे ट्राॅफीचा मानकरी ठरला. यादरम्यान त्याने मर्सडिजच्या लुईस हॅमिल्टन आणि एस्टन मार्टिनच्या फर्नांडाे अलाेन्साेला मागे टाकले. यामुळे हॅमिल्टनला दुसऱ्या व फर्नांडाेला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. वर्सटापेनने सत्रात दुसरी रेस जिंकली आहे. रेड बुलचा हा रेस बहरीन स्पर्धेतही किताब विजेता ठरला हाेता.