आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कतार:स्टेडियमच्या बाहेर 30 डिग्री तापमान, आतमध्ये 22 डिग्री

औरंगाबाद13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कतारमध्ये फुटबॉल विश्वचषकासाठी येणारे चाहते केवळ आपल्या आवडत्या खेळाडूंचे कौशल्यच पाहणार नाहीत, तर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे साक्षीदार बनतील. नवीन टेक्नॉलाॅजी व आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वापरामुळे यंदाचा विश्वचषक आतापर्यंतचा सर्वाधिक आधुनिक तंत्रज्ञानाचा विश्वचषक असेल. आधुनिक मेट्रो रेल्वे नेटवर्क, आधुनिक वाहतूक पद्धत, स्टेडियमच्या कूलिंग टेक्नॉलॉजीमुळे चाहत्यांना स्टेडियमच्या आतच नाही, तर बाहेरही हायटेक सुविधा पाहायला मिळतील. कतारने चाहत्यांना सर्व ८ स्टेडियममध्ये जाण्यासाठी मेट्रोचे उत्कृष्ट नेटवर्क बनवले आहे.

एकाही रेल्वेत चालक नसेल. विश्वचषकाच्या ८ पैकी ७ स्टेडियममध्ये आधुनिक कूलिंग टेक्नॉलाॅजी आहे, ज्यामुळे आतील वातावरण गार होईल. तसेच ८० हजार प्रेक्षक क्षमता असलेल्या लुसेल स्टेडियमच्या बाहेरचे वातावरण ३० डिग्री सेल्सियस असेल, तर आतील वातावरण २२ डिग्री राहील. स्टेडियमच्या बाहेर एक ऊर्जाकेंद्र असेल, जेथे पाइपलाइनद्वारे थंड पाणी नियोजित ठिकाणी लावलेल्या एसीपर्यत जाईल. तेथून थंड हवा बाहेर येईल. प्रथमच एखाद्या खुल्या स्टेडियमला वातानुकूलित बनवले आहे. या आर्टिफिशियल कूलिंग टेक्नॉलॉजीमध्ये हवा फिल्टर करण्याची सिस्टिमदेखील आहे. केवळ स्टेडियमच नाही, तर फुटबॉलमध्येही एआय आहे. विश्वचषकात वापरल्या जाणाऱ्या चेंडूचे नाव अल रिहला आहे, ज्याच्या मध्यभागी मोशन सेन्सर असेल. अदिदासद्वारे बनवलेल्या चेंडूंत कनेक्टेड बॉल टेक्नॉलॉजी आहे, जी संबंधित डेटा व्हीएआर (व्हिडिओ असिस्टंड रेफरी) अधिकाऱ्यांना अचूक वेळेत पाठवेल. हे सेन्सर चेंडूचा डेटा एका ऑपरेशन रूममध्ये ५०० बार प्रति सेकंदात पाठवेल, त्यामुळे किक पॉइंटची अचूक माहिती मिळू शकेल. विश्वचषकात प्रथमच अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. प्रत्येक स्टेडियममध्ये चेंडूचे स्थान माहिती करण्यासाठी १२ कॅमेरे लावले आहेत, जे खेळाडूंच्या शरीराच्या २९ पाॅइंटचा डेटादेखील कव्हर करेल.

बातम्या आणखी आहेत...