आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • 30 month Game In 15 Years Of IPL, 24,000 Crore From Board Media Rights, 2,500 Crore Extra Revenue

झटपट कमाई:IPLच्या 15 वर्षांत 30 महिन्यांचा खेळ, बोर्डाची मीडिया हक्कांतून 24 हजार कोटी, तर खेळाडूंची 2,500 कोटी कमाई

औरंगाबाद18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएलने एकीकडे क्रिकेटच्या चाहत्यांसाठी मनोरंजनाचे दरवाजे उघडले तर दुसरीकडे बीसीसीआय आणि खेळाडूंवर पैशाचा पाऊसही पाडला.

१५ वर्षांच्या १५ हंगामांत केवळ ३० महिने(प्रतिसीझन २ महिने) खेळलेल्या आयपीएलच्या प्रसारमाध्यम हक्कासाठी बीसीसीआयने आतापर्यंत २४ हजार कोटी रु. कमावले आहेत. या वेळी चाललेल्या लिलावात पुढील पाच वर्षांचे मीडिया राइट्स सुमारे ७० हजार कोटी रु.पर्यंत विकू शकतात.दुसरीकडे, खेळाडूंच्या बोलीच्या रूपात २,५०० कोटी रु.पेक्षाही जास्त मिळाले आहेत. क्रिकेटच्या चाहत्यांना १५ सीझनमध्ये ९५७ टी-२० सामन्यांचा आनंद मिळाला.

आयपीएल; 44 हजार कोटींत स्टारकडे टीव्ही तर रिलायन्सकडे डिजिटल हक्क

बीसीसीआय उर्वरित सामन्यांच्या हक्कांतून १२ वर्षांत १२,७४१ कोटी रुपये कमवू शकली.

2018-2023 - 6138 कोटी 2012-2017 - 4603 कोटी 2009-2011 - 2000 कोटी

आयपीएल सामन्यांचे मीडिया हक्क
2008-2018 ~8200 कोटी
2018-2022 16,347 कोटी
एकूण 24,547 कोटी

-२००८ मध्ये सोनीने आयपीएल मीडिया हक्क १० वर्षांसाठी ८,२०० कोटींत खरेदी केले होते. -२०१५ मध्ये स्टार इंडियाच्या मालकीच्या नोव्ही डिजिटलला ३ वर्षांसाठी हे ३०२ कोटींत मिळाले. -२०१८ ते २०२२ चे आयपीएलच्या माध्यमांचे हक्क स्टारकडे आहेत.

या वेळी सर्वात जास्त २०४ खेळाडूंना ५५१ कोटी रुपयांत खरेदी केले
वर्ष - खेळाडू - विक्री
2013- 37- 69 कोटी रु.
2014 - 154 - 262
2015- 67 - 87
2016 - 94 -136
2017 66 91

वर्ष खेळाडू विक्री 2018 169 431 कोटी रु. 2019 60 106 2020 62 140 2021 57 145 2022 204 551

-महेंद्रसिंह धोनीने आयपीएलमधून आतापर्यंत केवळ वेतनाद्वारे सर्वात जास्त १६४ कोटी, रोहितने १६२ व कोहलीने १५८ कोटी रु. कमावले आहेत.

बातम्या आणखी आहेत...