आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुटबाॅल वि‌श्वचषक:कतारमध्ये पर्यटनातून 32 हजार काेटींची कमाईची माेठी संधी

औरंगाबाद5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

फुटबाॅलच्या वि‌श्वचषकाचे आयाेजन करणारा कतार हा लहान देश आहे. त्यामुळे या ठिकाणी राहण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागेल. याच कारणांनी अनेक फुटबाॅलप्रेमींनी जवळच्या देशात मुक्काम करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांना विमानाने काही वेळात दाेहामध्ये दाखल हाेता येणार आहे. या विश्वचषकादरम्यान जगभरातील लाखाे फुटबाॅलप्रेमी कतारमध्ये हजेरी लावणार आहेत. याच्या माध्यमातून कतारला माेठा फायदा हाेणार आहे. कतारला पर्यटनातून जवळपास ३२ हजार काेटींची कमाई करता येणार आहे. चाहत्यांसाठी वि‌श्वचषकादरम्यान खास शटल फ्लाइटची व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे चाहत्यांना राेज ये-जा करण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय दाेहामधून राेज १८० पेक्षा अधिक विमानांचे उड्डाण हाेणार आहे. यासाठी टूर्स अँड ट्रॅव्हर्ल्स कंपन्यांनी माेठी गुंतवणूक केली आहे. त्यामुळे चाहत्यांना माेठ्या प्रमाणात सुविधा देण्यावर भर देण्यात आला आहे. यातून पर्यटनाला चालना मिळणार आहे.

बातम्या आणखी आहेत...