आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • 36 Teams Will Participate In The Tournament Instead Of 32; The Club Will Play 10 Matches In The First Round

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चॅम्पियन लीग:32 एेवजी 36 संघ स्पर्धेत सहभागी होणार; पहिल्या फेरीत क्लब 10 सामने खेळणार

13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्याचा चॅम्पियन बॉयर्न म्युनिचचा लेवानडोस्की १५ गोलसह अव्वलस्थानी आहे. - Divya Marathi
सध्याचा चॅम्पियन बॉयर्न म्युनिचचा लेवानडोस्की १५ गोलसह अव्वलस्थानी आहे.
  • चॅम्पियन लीगच्या नियोजनात होणार बदल, नवे नियम 2024-25 मध्ये लागू होऊ शकतात

युरोपमधील मुख्य फुटबॉल स्पर्धा यूएफा चॅम्पियन लीगमध्ये बदल करण्यात येणार आहे. सध्याच्या नियोजनानुसार ३२ संघ स्पर्धेत सहभागी होतात. त्यांची ८ गटांत विभागणी होते. एक संघ ६ साखळी सामने खेळतो. त्यानंतर अव्वल-२ संघ बाद फेरीत प्रवेश करतात. त्यानंतर २ उपउपांत्यपूर्व, २ उपांत्यपूर्व व २ उपांत्य सामन्यांनंतर अंतिम लढत होईल. अंतिम सामना खेळणारा संघ एकूण १३ सामने खेळतो. नव्या नियमानुसार अंतिम सामना खेळणारा संघ १७ सामने खेळेल. हा नियम २०२४ पासून लागू होऊ शकतो. याच महिन्यात यूएफाच्या बैठकीत त्याला मंजुरी मिळू शकते.

नव्या नियोजित प्रकारात ३६ संघ
नव्या प्रकारात संघाची संख्या वाढवून ३६ करण्यात आली आहे, ज्यात दोन वाइल्ड कार्ड प्रवेश असतील. त्यांची निवड गतचॅम्पियन लीग व युरोपा लीगच्या कामगिरीवर आधारित असेल. यात गट नसेल. प्रत्येक संघ गुणवत्ता व भौगोलिक आधारे ५ होम व ५ अवे सामने खेळेल. सर्व संघ समोरासमोर येणार नाहीत. संघ एकाच तालिकेत असतील.

८ संघ बाद फेरीत प्रवेश करतील
प्री-क्वार्टर फायनलमध्ये १६ संघ असतील. सर्व संघ १०-१० सामने खेळल्यानंतर अव्वल-८ संघ थेट बाद फेरीत प्रवेश करतील. त्यामुळे १२ संघ स्पर्धेबाहेर होतील. ९ ते १६ दरम्यान असलेला संघ १७ ते २४ दरम्यानच्या कुठल्याही संघ विरुद्ध होम व असे सामना खेळेल. त्यातील ८ विजेता संघ उपउपांत्यपूर्व सामन्यात प्रवेश करतील. त्यानंतर पुन्हा सध्याच्या पद्धतीनुसार उपउपांत्यपूर्व, उपांत्यपूर्व आणि उपांत्य सामन्यांनंतर अंतिम सामना होईल.

प्रक्षेपणातून कमाई करण्याचा उद्देश
नव्या पद्धतीनुसार चॅम्पियन लीगमध्ये जवळपास १०० सामने होतील. ज्यामुळे प्रक्षेपणातून व स्टेडियममध्ये येणाऱ्या चाहत्यांच्या माध्यमातून उत्पन्न वाढेल. यूएफानुसार, नव्या प्रकारामुळे सर्व संघांना बाद फेरीत प्रवेश मिळवण्याची संधी मिळेल, त्यामुळे स्पर्धा रोमांचक होईल. सध्या मोठे संघ विजयी झाल्यानंतर साखळी फेरीत आकर्षण राहत नाही. सर्व एकच गट असल्याने अनेक मोठे फेरबदल पहायला मिळेल.

बातम्या आणखी आहेत...