आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराफिफा वर्ल्डकपचा विजेता आज रात्री ठरेल. दोन वेळचा जेता अर्जेंटिना व गतविजेता फ्रान्स दोघेही इतिहास रचतील. फ्रान्स जिंकल्यास हा सलग दुसरा तर एकूण तिसरा (१९९८-२०१८) चषक ठरेल. अर्जेंटिनाचाही हा तिसरा (दोन वेळा १९७८-१९८६) किताब असेल. दोन्ही संघ आतापर्यंत बारा वेळा भिडलेले आहेत. अर्जेंटिनाने ६, फ्रान्सने ३ सामने जिंकले आहेत. सुपर कॉम्प्युटरच्या विश्लेषणानुसार विजयाची शक्यता ३५.१% व फ्रान्सची ३५% आहे. एआयच्या विश्लेषणानुसार ५१ टक्क्यांसह फ्रान्स विजेता ठरेल.
अर्जेंटिनाच्या फॅन्सचे पारडे जड आर्थिक संकटातील अर्जेंटिनाच्या ब्यूनस आयर्सहून कतारला जाण्यासाठी २४ तास लागतात. सध्या ४० हजार चाहते कतारमध्ये आले आहेत. फ्रान्सहून कतारचे अंतर १० तासांचे आहे. पण कतारला १० हजार चाहते आले आहेत.
क्रोएशिया तिसऱ्या स्थानी : तिसऱ्या स्थानासाठी शनिवारी क्रोएशियाने मोरोक्कोला २-१ ने हरवले. १९९८ मध्येही क्रोएशिया तिसऱ्या स्थानी होता.
{फ्रान्स वर्ल्डकप विजेता झाल्यास एमबापे २४ व्या जन्मदिनापूर्वी दोन वेळा कप जिंकणारा पेलेनंतर दुसरा {जगभरात मेसी जर्सीचा स्टॉक संपला. आदिदासने त्याची पुष्टी केली . {फ्रान्स जिंकल्यास ह्यूगो लॉरिस दोन चषक जिंकणारे पहिले कर्णधार.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.