आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला आयपीएल:स्पर्धेतून बीसीसीआयला 4हजार काेटी, प्रत्येक टीमवर लागणार 500 ते 600 काेटींची बाेली

मुंबई5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

यंदापासून महिलांच्या आयपीएलच्या आयाेजनाला सुरुवात हाेत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वतीने मार्च महिन्यात या पहिल्या सत्राच्या लीगचे आयाेजन करण्यात आले. या लीगमध्ये महिलांचे पाच संघ सहभागी हाेतील. या पहिल्याच सत्राच्या महिला आयपीएलमधून बीसीसीआयला माेठा आर्थिक फायदा हाेणार आहे. यातून बीसीसीआयला ४ हजार काेटींची कमाई करता येणार आहे.

स्पर्धेत पाच संघ सहभागी हाेणार आहेत. यातील प्रत्येक टीमवर जवळपास ५०० ते ६०० काेटींची बाेली लागण्याचे चित्र आहे. याशिवाय या लीगच्या प्रक्षेपण हक्कातूनही बीसीसीआयला माेठी कमाई करता आली आहे. याशिवाय स्पाॅन्सरशिप आणि काे स्पाॅन्सरशिपच्या माध्यमातूनही मंडळाला माेठा आर्थिक फायदा हाेत आहे. या लीगमधील संघ खरेदीसाठी जवळपास ३० कंपन्यांनी कंबर कसली आहे.

बातम्या आणखी आहेत...