आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • 45,000 FIDE Competitions In 114 Days Of Lockdown; 80 Percent Youth Participation; Checkmate The Frustration Online

संकटात बुद्धिला चालना:लाॅकडाऊनच्या 114 दिवसांत फिडेच्या 45 हजार स्पर्धा; 80 टक्के युवांचा सहभाग; ऑनलाइनने निराशेला चेकमेट

एकनाथ पाठक | औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महाराष्ट्रात ऑनलाइन स्पर्धांचे आयाेजन; साेलापूर आघाडीवर

काेराेनाच्या संकटामुळे जगभरातील स्पाेर्ट््स इव्हेंट पूर्णपणे लाॅक आहेत. मात्र, याच महामारीतही सकारात्मक नजरेतून आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ फेडरेशनच्या वतीने (फिडे) स्पर्धांच्या आयाेजनावर अधिक भर देण्यात आला. त्यामुळेच लाॅकडाऊनच्या ११४ दिवसांत (२२ मार्च ते १५ जुलै) जागतिक स्तरावर फिडेच्या वतीने जवळपास ४५ हजार बुद्धिबळ स्पर्धांचे आयाेजन केले. लाॅकडाऊनमध्येच अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे ऑनलाइन स्पर्धांचे आयाेजन केले. भारतात ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धांचे आयाेजन झाले. ऑनलाइन स्पर्धेत भारतासह स्पेन, रशिया, जर्मनी, स्वीडन, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियन बुद्धिबळपटूंनी माेठ्या संख्येत सहभाग घेतला. याशिवाय लाॅकडाऊनमध्ये निराशेला चेकमेट करण्यासाठी चेस अॅपही फायदेशीर ठरले. याला ७० टक्केपेक्षा अधिक चाहत्यांनी पसंती दर्शवली.

खेळीच्या स्वरूपात वेगवान बदल; चाली झाल्या गतिमान

लाॅकडाउनच्या काळातही बुद्धिबळ स्पर्धेच्या आयाेजनावर अधिक भर दिला जात आहे. त्यासाठी अत्याधुनिक तंत्रप्रणालीचा आधार घेण्यात आला. यातूनच ऑनलाइनच्या माध्यमातून बुद्धिबळ स्पर्धेचे आयाेजन केले जात आहे. याच ऑनलाइन पद्धतीमुळे खेळाडूंमध्ये खेळण्याची वेगवान शैली विकसित झाली आहे. यातूनच आता बुद्धिबळ हा खेळ लॉकडाऊनच्या माध्यमातून अधिक प्रगत झाला. याच्या आधारेच या खेळातील चाली गतिमान झाल्या आहेत. ऑनलाइन स्पर्धेत कमी वेळात चाली कराव्या लागतात.

भारतात १०० + ऑनलाइन स्पर्धा

भारतात लाॅकडाऊनच्या काळात १०० पेक्षा अधिक ऑनलाइन स्पर्धांचे आयाेजन करण्यात आले. यातून युवांना आपल्या प्रगल्भ बुद्धिमत्तेला चालना देता आली. अखिल भारतीय बुद्धिबळ फेडरेशनच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान व झारखंडमध्ये ऑनलाइन स्पर्धांचे आयाेजन करण्यात आले.

२० लाखांच्या बक्षिसांचे मानकरी : 

भारतामध्ये आयाेजित करण्यात आलेल्या ऑनलाइन स्पर्धांमधून विजेत्यांवर लाखाे रुपयांच्या बक्षिसांचा वर्षाव झाला. या स्पर्धांमध्ये फेडरेशनच्या वतीने जवळपास २० लाखांपेक्षा अधिक बक्षिसे देण्यात आली. विजेत्या खेळाडूंच्या खात्यावर थेट बक्षिसाची रक्कम जमा करण्यात आली आहे. त्यामुळे खेळाडूंतील नैराश्य दूर झाले आहे.

असा सकारात्मक बदल

> आयाेजन आटाेक्यात : ८० %

>  वेगवान चाली : ९०%

>  गतिमान विचारशक्ती : ७०%

>  गुणवत्तेतील प्रगती : ६० %

>  खेळाडूंचा सहभाग : ९० %

नव्या स्वरुपातील बदल ठरताेय फायदेशीर

लाॅकडाउनच्या काळात ऑनलाइनच्या माध्यमातून बुद्धिबळ स्पर्धेचे आयाेजन केले जात आहे. हा स्पर्धा आयाेजनाच्या स्वरूपातील नवा बदल खऱ्या अर्थाने सर्वांसाठी फायदेशीर ठरत आहे. जगातील सर्वच स्पाेर्ट््स इव्हेंट पूर्णपणे बंद आहेत. मात्र, एकमेव बुद्धिबळ खेळातील जागतिक दर्जाच्या स्पर्धांचे आयाेजन सातत्याने हाेत आहे. भारत चाैहान, सचिव, अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना, दिल्ली