आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासामनावीर कर्णधार राेहित शर्माने (६५) झंझावाती खेळीच्या बळावर पाच वेळच्या किताब विजेत्या मुंबई इंडियन्स संघाला मंगळवारी यंदाच्या सत्रातील आयपीएलमध्ये विजयाचे खाते उघडून दिले. सलगच्या दाेन पराभवानंतर मुंबई संघाने लीगमधील आपल्या तिसऱ्या सामन्यात डेव्हिड वाॅर्नरच्या दिल्ली कॅपिटल्सचा ६ गड्यांनी पराभव केला. डेव्हिड व कॅमरून ग्रीनने षटकार खेचून मंुंबई संघाचा विजय निश्चित केला.
मुंबई इंडियन्स संघाच्या पीयूष चावला (३/२२) व जेसन बेहरेड्राॅफने (३/२३) धारदार गाेलंदाजीतून प्रथम फलंदाजी करणाऱ्या यजमान दिल्ली कॅपिटल्सचा १९.४ षटकांत अवघ्या १७२ धावांत खुर्दा उडवला. प्रत्युत्तरात मुंबई संघाने ४ गड्यांच्या माेबदल्यात विजयश्री खेचून आणली. यासह दिल्ली कॅपिटल्स संघाला लीगमध्ये सलग चाैथ्या पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान संघाच्या विजयासाठी कर्णधार डेव्हिड वाॅर्नर (५१) आणि अक्षर पटेलने (५४) केलेली अर्धशतकी खेळी व्यर्थ ठरली.
राेहितचे २३ एप्रिल २०२१ नंतर अर्धशतक : मुंबईचा कर्णधार राेहित २५ डाव आणि ७१८ दिवसांनंतर आयपीएलमध्ये फाॅर्मात आला आहे. त्याने २३ एप्रिल २०२१ नंतर आता आयपीएल अर्धशतक साजरे केले. त्याने ४५ चेंडूंत ६ चाैकार व ४ षटकारांतून ६५ धावा काढल्या. त्याचे हे सत्रात पहिले अर्धशतक ठरले. यापूर्वी त्याने २०२१ मध्ये पंजाब संघाविरुद्ध ५२ चेंडूंत ६३ धावांची खेळी केली हाेती.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.