आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतासाठी गर्वाचा क्षण:वर्ल्डकपमध्ये 5-जी ची जादू, 250 च्या संघात 60% भारतीय

परीक्षित त्रिपाठी | रायपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

फुटबॉलचा महाकुंभ पार पडला. २९ दिवसांचा फिफा वर्ल्डकप ३२ देशांच्या संघांत खेळला गेला, परंतु पडद्यामागे २५० असे खेळाडू पूर्ण ताकदीने खेळले की त्यांच्यामुळे जगाने 5जी जादू बघितली. हा पहिलाच वर्ल्ड कप पूर्ण 5जी सपोर्टवर आधारित होता. जगभरातून आलेल्या २५० टेलिकॉम आणि नेटवर्क एक्स्पर्टमुळे केवळ कमांड सेंटरच नव्हे तर प्रत्येक सामन्याचे लाइव्ह फीड्स, ब्रॉडकास्ट, एआय कंट्रोल, सिक्युरिटी सिस्टम, अॅडव्हान्स्ड एल्गोरिदम मॅनेजमेंट, आठही स्टेडियम 5जी शी कनेक्ट राहिले. ही उपलब्धी भारताचाही गौरव करणारी आहे. 5जी नेटवर्किंग करणाऱ्या २५० इंजिनिअर्समध्ये १६० भारतीय होते. यात एरिक्सनच्या टीमचे नेतृत्व करणारे कुलदीप टंडन, मिडिल ईस्ट व आफ्रिका नेटवर्क मॅनेजमेंट सिस्टिम लीडर हर्ष तिवारी प्रमुख आहेत.

फायनलचा ‘एंजेल’ डी मारियाएंजेल डी मारियाने फाउल कमावला. याच जोरावर मेसीने पहिला गोल केला. नंतर दुसरा गोल एंजेलने डागला. विशेष म्हणजे एंजेल फायनल सामन्यात सुरुवातीपासूनच खेळण्यास उतरला.

या वेळी विक्रमी १७२ गोल : वर्ल्डकपमध्ये १७२ गोल झाले. १९३० नंतर ही संख्या सर्वाधिक. आतापर्यंत १७१ गोलचा विक्रम होता. १९६६ नंतर पहिल्यांदा वर्ल्ड कप फायनलमध्ये ६ गोल झाले. मेसीने सामन्याच्या २३ व्या मिनिटाला पेनल्टीला गोलमध्ये बदलले. हा त्याचा फायनलमधील पहिला गोल होता

बातम्या आणखी आहेत...