आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खेलो इंडिया यूथ गेम्स:महाराष्ट्राला 5 सुवर्ण; सुदेष्णा, आन्या, अपेक्षा चॅम्पियन

पंचकुला25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वेगवान धावपटू सुदेष्णा शिवणकरने ट्रॅकवरचा आपला दबदबा कायम ठेवताना गुरुवारी चाैथ्या सत्राच्या खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये सुवर्णपदकाचा डबल धमाका उडवला. तिने २०० मीटरसह रिलेमध्ये प्रत्येकी एका सुवर्णपदकाची कमाई केली. महाराष्ट्र संघाने आपली माेहीम अबाधित ठेवताना दिवसभरात अॅथलेटिक्समध्ये तीन सुवर्ण, एक रौप्यपदक मिळाले. जलतरणात दोन सुवर्ण आणि दोन कांस्यपदके आली. खो-खोमध्ये मुला-मुलींच्या संघांनी विजयी सलामी देत आगेकूच केली.

टेबल टेनिसमध्ये सायली राजेश वाणी व प्रिथा प्रिया वर्तीकर यांनी विजय मिळवला. जलतरणमध्ये ४०० मीटर फ्रीस्टाइल - आन्या वाला (मुंबई) हिने सुवर्ण, १०० मीटर बटरफ्लाय - अपेक्षा फर्नांडिस हिनेही सुवर्णपदक जिंकले. १०० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये पुण्याच्या उत्कर्ष गौर व १०० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये मुंबईच्या पलक जोशीने कांस्यपदकावर नाव कोरले. वेटलिफ्टिंगमध्ये मुलांच्या संघाला सर्वसाधारण उपविजेतेपद मिळाले. मुलींच्या ४ बाय ४०० रिलेच्या संघाने विजेतेपदक उंचावले. २०० मीटरमध्ये सुदेष्णा शिवणकरने आजही सुवर्ण कामगिरी केली. अवंतिकाला याच प्रकारात रौप्यपदक मिळाले.

बातम्या आणखी आहेत...