आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • 500+ Player Initiative For Corona Warriors ’absence At Kalinga Stadium; Plessis Helps Young People

मंडे पॉझिटिव्ह:कलिंगा स्टेडियममध्ये कोरोना वॉरियर्सच्या गाैरवासाठी 500+ खेळाडूंचा पुढाकार; प्लेसिसची युवांना माेठी मदत

2 महिन्यांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • काेराेनाच्या संकटमय वातावरणात नागरिकांच्या मदतीसाठी खेळाडू घेत आहेत पुढाकार, इव्हेंटलाही हाेणार सुरुवात
  • इंग्लंडमध्ये आजपासून हाॅर्स रेसिंग व स्नूकर स्पर्धेचे सामने सुरू हाेणार
Advertisement
Advertisement

देशात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. त्याविरोधात लढणाऱ्या लोकांच्या सम्मानासाठी खेळाडू पुढे आले. भुवनेश्वरच्या कलिंग हॉकी स्टेडियममध्ये कोरोना वाॅरियर्सच्या सन्मानार्थ क्रीडा विभागातर्फे कार्यक्रमाचे आयोजन केले.  यात खेळाडू व कलाकार सहभागी झाले होते. दुसरीकडे डुप्लेसिसने ३५००० लहान मुलांना अन्नाची पाकिटे वाटली. ताे जनजागृतीसाठी परिसरात जात आहे.

प्लेसिस जनजागृती करण्यासाठी परिसरात जाऊन संवाद साधत आहे.

क्रिकेट :  श्रीलंका संघाचे १३ खेळाडू आजपासून सराव सुरू करतील

कोलंबो| श्रीलंकेचे १३ खेळाडू सोमवारपासून सराव सुरू करतील. १२ दिवसांचे शिबिर कोलंबो क्रिकेट क्लबमध्ये होईल. एका गटात चार खेळाडू असतील.  सहभागी  खेळाडू सरावानंतर हॉटेल किंवा सराव परिसरातून बाहेर जाऊ शकणार नाहीत. मार्चपासून देशात क्रिकेट बंद आहे. जुलैमध्ये टीम भारताला दौऱ्यासाठी बोलवू इच्छिते. 

सन्मान : कार्यक्रमात माजी हाॅकी कर्णधार दिलीप तिर्की व इतर उपस्थित

भुवनेश्वर| हाॅकी स्टेडियममध्ये  खेळाडू व कलाकारांसह ५०० पेक्षा अधिक लोक सहभागी झाले होते. यात हॉकी संघाचा माजी कर्णधार दिलीप तिर्की, धावपटू दुती चंदसह अनेक खेळाडू उपस्थित होते. विविध विभागांत काम करत असलेले खेळाडू ेखील स्वयंसेवक म्हणून मदतीसाठी धावले.

पुनरागमन : इंग्लंडध्ये आजपासून सुरू होणार प्रेक्षकाविना सामने

लंडन| ब्रिटनच्या सरकारने १ जूनपासून घरच्या स्पर्धा आयोजनास परवानगी दिली आहे. मात्र, चाहत्यांच्या येण्यावर बंदी कायम राहील. मार्चच्या मध्यापासून खेळ पूर्णपणे बंद आहे. घोडेस्वारी आणि स्नूकरचे सामने सोमवारपासून सुरू होतील. इंग्लिश प्रीमियर लीगला १७ जूनपासून सुरुवात हाेईल.

फॉर्म्युला-1: ऑस्ट्रियाने सत्राची सुरुवात हाेणार

व्हिएन्ना| फॉर्म्युला वनचे सत्र एक मार्चपासून सुरू होणार होते. अद्याप सुरू झालेले नाही. जुलैपासून त्याची सुरुवात केली जाऊ शकते. ऑस्ट्रिया सरकारने विना चाहत्यांच्या शर्यतीला परवानगी दिली.

टेनिस :  खेळाडूंसाठी  चार्टर विमानाची व्यवस्था

न्यूयॉर्क| यूएस ओपनला २४ ऑगस्टपासून सुरुवात हाेईल.  सहभागी खेळाडूंना चार्टर विमानाने बोलावण्याची तयारी करत आहे. प्रवासापूर्वी खेळाडूंना कोविडची चाचणी करणे आवश्यक राहील.

Advertisement
0