आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • 55th National Championship Kho Kho Tournament Host Maharashtra Teams Reach Semi Quarter Round

55 वी राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा:यजमान महाराष्ट्र संघांची उपउपांत्यपूर्व फेरीत धडक

उस्मानाबाद9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्णधार रेश्मा राठाेड आणि सूरजच्या कुशल नेतृत्वाखाली यजमान महाराष्ट्र संघांनी आपली विजयी माेहीम कायम ठेवताना मंगळवारी ५५ व्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो- खो स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. तसेच गत चॅम्पियन रेल्वे, विदर्भ, काेल्हापूर संघांनी आपली आगेकूच कायम ठेवली. आता गत चॅम्पियन महाराष्ट्र महिला संघाचा सामना आंध्र प्रदेशविरुद्ध हाेणार आहे. तसेच गत उपविजेत्या महाराष्ट्र पुरुष संघासमाेर गुजरात टीमचे आव्हान असेल. महाराष्ट्राने मंगळवारी साखळीतील शेवटचे दोन्ही सामनेही डावाने जिंकले.

गतविजेत्या महाराष्ट्र महिला संघाने सकाळच्या सत्रामध्ये उत्तर प्रदेशला धूळ चारली. महाराष्ट्र संघाने २१-९ असा दणदणीत विजय संपादन केला.नाणेफेक जिंकून आक्रमण करताना प्रियंका इंगळे हिने धारदार आक्रमण करताना ८ गडी टिपले. अपेक्षा सुतार आणि दीपाली राठोड यांनी प्रत्येकी ३ तर पुजा व संपदा मोरे यांनी प्रत्येकी २ गुण संघास मिळवून दिले. संरक्षणाच्या डावात अपेक्षा सुतार २.३० मि. आणि अश्विनी शिंदे ३.०५ मि. संरक्षण केले. सामन्यात मध्यंतराच्या २१-४ अशा गुणस्थितीनंतरच्या संरक्षणाच्या डावात महाराष्ट्र संघाच्या प्रिती काळे २.३० मि. व दीपाली राठोडने २.०५ मि.पळती केली. त्यामुळे महाराष्ट्र महिला संघाला एकतर्फी विजय साकारता आला.

महाराष्ट्राची डावाने मध्य भारतवर मात पुरुष गटात महाराष्ट्राने मध्यभारतवर २१-९ अशी डावाने बाजी मारली. मध्यभारतने नाणेफेक जिंकून संरक्षण स्विकारले. प्रथम आक्रमणाच्या डावामध्ये महाराष्ट्राच्या ऋषिकेश मरचावडे ४, लक्ष्मण गवस, निहार दुबळे व सुरज लांडे यांनी प्रत्येकी ३ गडी टिपले. संरक्षणाच्या डावामध्ये प्रतीक वाईकर ३.०० मि., लक्ष्मण गवस २.४० मि. पळतीचा खेळ केला. मध्यंतराच्या २१-०५ अश्या स्थितीनंतर दुसऱ्या संरक्षणात दिलीप खांडवी २.३० मी, आदित्य गनपुले २.१० मिनिटे संरक्षण केले. तसेच पुरुष गतविजेते रेल्वे व महिला गत उपविजेते भारतीय विमान प्राधिकरण, कोल्हापूर, विदर्भाच्या पुरुष व महिला संघानेही उपउपांत्यपूर्व फेरी गाठली.

बातम्या आणखी आहेत...