आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • 58th State Championship Kho Kho Tournament: Both Solapur Teams Defeated, Ratnagiri, Osmanabad Teams In Semifinals

58 वी राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धा:सोलापूरचे दोन्ही संघ पराभूत, रत्नागिरी, उस्मानाबाद संघ उपांत्य फेरीत

हिंगाेली5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई उपनगर, रत्नागिरी, उस्मानाबाद, ठाणे, सांगली, पुणे संघांनी विजयी माेहीम कायम ठेवताना साेमवारी ५८ वी पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. यादरम्यान साेलापूरच्या दाेन्ही संघांना स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. महिलांच्या उपांत्यपूर्व सामन्यात उस्मानाबादने मुंबईचा एक डाव १२ गुण (१७-५) पराभव केला. उस्मानाबादतर्फे अश्‍विनी शिंदे (३ मि. संरक्षण व ३ गुण), संपदा मोरे (३ मि. संरक्षण व ४ गुण) यांनी तर मुंबईतर्फे मानसी आंबोकरने (१ मि. संरक्षण) चांगला खेळ केला. दुसऱ्या सामन्यात ठाणेने सोलापूरवर १० गुणांनी (२१-११) मात केली. ठाणेतर्फे रूपाली बडे (३.१०, २.१० मि. संरक्षण), गीतांजली नरसाळे (१.४० मि. संरक्षण), पूजा फरगडे (५ गुण) यांनी चांगला खेळ केला. अन्य सामन्यांत पुण्याने नाशिकचा १ डाव ५ गुणांनी (११-६) धुव्वा उडवला. पुण्यातर्फे प्रियंका इंगळेने (३.२० मि. संरक्षण व ६ गुण), स्नेहल जाधव (३ मि. संरक्षण) यांनी चमकदार कामगिरी केली. पुरुषांच्या उपांत्यपूर्व सामन्यात सांगलीने सोलापूर १५-१३ असा दोन गुण आणि आठ मिनिटे राखून पराभव केला. विजयी संघातर्फे सूरज लांडे (२, १.४० मि. संरक्षण व २ गुण), अक्षय मासल (१.१०, १.३० मि. संरक्षण व ३ गुण ) यांनी तर सोलापूरतर्फे अक्षय इंगळे (१.१० मि. संरक्षण) चांगला खेळ केला. दुसऱ्या सामन्यात पुण्याने उस्मानाबादचा १२-१० असा २ गुण आणि ७ मि. राखून पराभव केला. पुणेतर्फे आदित्य गणपुळे (२,२ मि. संरक्षण व १ गुण), प्रतीक वायकरने (१.१०, २, मि. संरक्षण व २ गुण ) विजय मिळवून दिला. उस्मानाबादतर्फे विजय वसावेने (१.१४, १.१० व १ गुण) चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले.

बातम्या आणखी आहेत...