आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कॅनडातील रोरी वॅनचे वय केवळ ७ वर्षे आहे. दिसण्यात सर्वसामान्य मुलीसारखी. खाणेपिणेही सामान्य, मात्र कठोर परिश्रम व प्रशिक्षणामुळे तिने स्वत:ला जगातील सर्वात मजबूत मुलगी बनवले. नुकतेच तिने वेटलिफ्टिंगचे यूएस अंडर- ११ व अंडर- १३ युवा राष्ट्रीय विजेतेपद पटकावले. ती अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात कमी वयाची विजेती आहे. रोरी एवढ्या कमी वयात हे सर्व कसे करतेय हे भास्करचे शादाब समी यांनी जाणून घेतले. वाचा विशेष बातचीत.
मी 20-20 ग्रॅम वजन वाढवायचे, नंतर 80 किलो वजन उचलण्याची शक्ती प्राप्त केली
छोट्या ध्येयातून मोठे यश
मी पाच वर्षांची असतानाच वेटलिफ्टिंग करायला लागले. मी वडिलांकडून शब्द घेतला की, जेव्हा मी वजन उचलेल तेव्हा त्यांनी मला नवे डंबल आणि बार बेल घेऊन द्यावेत. रोज माझी क्षमता वाढवण्याचे मी प्रयत्न केले. २०-२० ग्रॅम वजन जरी वाढवले तरी मोठी कामगिरी वाटायची. ६ वर्षांची होईपर्यंत मी माझ्या वजनाच्या तीनपट वजन उचलू लागले.
मीनाकुमारीचा प्रभाव
यूट्यूबवर यूएस संघातील वेटलिफ्टर क्रिस्टिन पोपला मी पाहिले. त्यातून वेटलिफ्टिंगची आवड निर्माण झाली. तीच माझी प्रेरणा आहे. माझ्या कुटुंबात मी एकटी अॅथलिट आहे. आई-वडील खेळ खेळत नाहीत. भावाला संगीताची आवड आहे. स्ट्रेंथ स्पोर्ट््समध्ये भारताची वेटलिफ्टर मीनाकुमारीपासून प्रभावित आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.