आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोरोक्कोच्या खेळाडूंनी स्पॅनिश क्लबसाठी खेळले 200+ सामने:स्पेनला हरवणाऱ्या मोरोक्कोच्या 73% खेळाडूंचा जन्म विदेशात

दोहा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोरोक्कोने स्पेनवर मात करत प्रथमच उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. उर्वरित ८ संघांमध्ये मोरोक्को हा एकमेव आफ्रिकन देश आहे. मोरोक्कोला इथवर पोहोचण्यासाठी ५२ वर्षे वाट पाहावी लागली आहे. ७७% चेंडूंचा ताबा असूनही स्पेनला एकही गोल करता आला नाही. याचे संपूर्ण श्रेय गोलरक्षक यासीन बोनोला जाते, ज्याने पेनल्टी शूटआऊटमधील सर्व शॉट्स रोखले. तसेच डिफेंडर अचरफ हकिमीनेही स्पेनला निर्धारित वेळेत एकही गोल करू दिला नाही. मोरोक्कोच्या सुरुवातीच्या अकरामधील तीन खेळाडू सध्या स्पॅनिश क्लबसाठी खेळतात. यासिनने स्पॅनिश क्लबसाठी २४७ सामने खेळले असून तो सध्या सेव्हिलाकडून खेळतो. त्याचबराेबर, हकिमीने स्पॅनिश क्लब रिअल माद्रिदसाठी ३७ सामने खेळले. हकिमीचा जन्मही स्पेनमधील माद्रिदचा आहे.

बातम्या आणखी आहेत...