आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • 8 year old Grihita, Who Broke The Record By Climbing 30 Forts In Maharashtra In A Year, At Mount Everest Base Camp

विशेष:वर्षभरामध्ये महाराष्ट्रातील 30 गडकिल्ले सर करत विक्रमाला गवसणी घालणारी 8 वर्षांची ग्रिहिता माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्पवर

मुंबई25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रेकाॅर्ड हाेल्डर आठ वर्षांच्या ग्रिहिता विचारेने नुकताच जगातील सर्वात उंच आणि आव्हानात्मक मानल्या जाणाऱ्या माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंतचा पल्ला यशस्वीपणे गाठला. तिने गत महिन्यात २८ आॅक्टाेबर राेजी ही माेहीम फत्ते केली. यासह ती सर्वात युवा ट्रेकर मानली जात आहे. तिने माेठ्या धाडस आणि मेहनतीच्या बळावर हे घवघवीत यश संपादन केले आहे.

तिने वयाच्या सातव्या वर्षी वडील सचिन आणि माेठी बहिणी हरितासाेबत महाराष्ट्रातील ३० पेक्षा अधिक गड-किल्ले, शिखरे सर केले. वयाच्या सातव्या वर्षी साडी घालून तिने माेहीम फत्ते करताना विक्रमाला गवसणी घातली. तिने वर्षभरात रतनगड, हरिहर गड, नवरा-नवरी, कळसुबाईसारख्या माेहिमा फत्ते केल्या आहेत.

विदेशातील पहिलीच माेहीम फत्ते : आतापर्यंत राज्यात सर्वाधिक उंचीची शिखरे, गडकिल्ले सर करणाऱ्या ग्रिहिताने पहिल्यांदाच विदेशातील माेहीम फत्ते केली. तिने या माेहिमेला २१ आॅक्टाेबरपासून माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्पच्या माेहिमेला सुरुवात केली. यादरम्यान माेहीम फत्ते करताना ग्रिहिताला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे तिला सरळ चढण असलेली शिखरे, उणे अंश तापमान, थंडगार वारा, गोठलेले पाणी, ऑक्सिजनच्या घसरत जाणाऱ्या पातळीच्या आव्हानाला सामाेरे जावे लागले. हा ट्रेक समुद्रसपाटीपासून १४०० मीटर उंच आहे. तिने हा १४८ किमीचा ट्रेक पुण केला. यादरम्यान तिने लुक्ला (समुद्रसपाटीपासून २८४३ मीटर उंच) ते फाकडिंग (२६१० मीटर उंच) ते नामचे बाजार (३४४० मीटर) ते टिंगबोचे (३८६० मीटर) ते डिंगबोचे (४४१० मीटर) ते लोबुचे (४९१० मीटर) ते गोरक्षेप (५१४० मीटर) ते काला पत्थर (५५५० मीटर) आणि अखेरीस मानाचा रुरा म्हणजेच एव्हरेस्ट बेस कॅम्प (५३६४ मीटर) असा प्रवास केला.

बातम्या आणखी आहेत...