आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराटोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा भारताचा स्टार एथलीट नीरज चोप्राने फिनलंडमध्ये सुरू असलेल्या कुओर्तने गेम्समध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. त्याने 86.89 मीटर फेक करून सुवर्णपदक जिंकले. नीरजने पहिल्याच प्रयत्नात 86.89 मीटर फेक केला होता आणि कोणताही खेळाडू त्याच्या जवळपासही पोहोचू शकला नाही.
निरजने त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या केशॉर्न वॉलकॉट आणि ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सला मागे टाकले. वॉलकॉट दुसऱ्या आणि पीटर्स तिसऱ्या स्थानावर आहे.
टोकियो ऑलिम्पिकनंतर पहिले सुवर्ण
टोकियो ऑलिम्पिकनंतर नीरज चोप्राचे हे पहिले सुवर्णपदक आहे. नीरजने कठीण परिस्थितीत पदक जिंकले आहे. पावसामुळे मैदानात खूप पाणी साचले होते, त्यामुळे नीरजचा एकदा पाय सुद्धा घसरला होता. तिसऱ्या प्रयत्नात भाला फेकल्यावर त्याचा पाय घसरला आणि तो रेषेच्या बाहेर गेला. त्यामुळे ती फेकही मोजल्या गेली नाही.
नीरजने पहिल्याच प्रयत्नात 86.69 मीटर फेक केली होती. त्याचा दुसरा थ्रोही फाऊल झाला. याआधी नीरज पावोने नूरमी गेम्समध्ये 89.30 मीटर फेक करून राष्ट्रीय विक्रम केला होता.
क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी नीरज चोप्राचा व्हिडिओ ट्विट केला आणि लिहिले की, नीरजला सुवर्ण मिळाले आहे, त्याने ती किमया पुन्हा केली आहे. विलक्षण चॅम्पियन.
नीरजचे पुढील लक्ष्य जागतिक चॅम्पियनशिप आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आहे
आता नीरजचे पुढील लक्ष्य जागतिक अजिंक्यपद आणि राष्ट्रकुल स्पर्धेत पदक जिंकण्याचे आहे. जागतिक अजिंक्यपद स्पर्धा 15 ते 24 जुलै दरम्यान अमेरिकेत होणार आहे. त्याचवेळी, 28 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत बर्मिंगहॅम येथे कॉमनवेल्थ गेम्स होणार आहेत.
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यानंतर नीरजने सांगितले की, देशासाठी राष्ट्रकुल आणि जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याचे आपले पुढील लक्ष्य आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.