आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
खेळाडूंच्या गुणवत्तेला चालना देण्यासाठी व संस्थांच्या बळकटीसाठी अांतरराष्ट्रीय अाॅलिम्पिक कमिटी (अायअाेसी) प्रयत्नशील अाहे. वार्षिक अार्थिक प्लॅनिंगमधून अायअाेसीच्या कार्याची व्याप्ती लक्षात येतेे. एकूण कमाईच्या ९० टक्के खर्च अायअाेसी दरवर्षी खेळाडू व खेळांच्या विकासावर करत असते. म्हणजेच २६ काेटी खेळाडू अाणि संस्था या दिवसाकाठी मदतीचे मानकरी ठरतात. कमाईतील उर्वरित १० टक्के रक्कम ही अायअाेसी अापल्या खास माेहिमेवर खर्च करते.
अांतराष्ट्रीय अाॅलिम्पिक कमिटीने २०१३ ते २०१६ या तीन वर्षांच्या दरम्यान जवळपास ५.७ मिलियन डाॅलर म्हणजेच जवळपास ४३ हजार २३० काेटींची कमाई केली.
चार स्पर्धेत नॅशनल अाॅलिम्पिक कमिटीला १२ हजार काेटी
अायअाेसीकडून जगभरातील नॅशनल अालिम्पिक कमिटीला (एनअाेसी) स्पर्धेत सहभाग अाणि अायाेजनासाठी माेठी अार्थिक मदत करते. यामध्ये जवळपास १२ हजार काेटींच्या मदतीचा समावेश अाहे. याच्या माध्यमातून याठिकाणी अायाेजनांका माेठा अाधार मिळाला व अायाेजन यशस्वी झाले.
गुणवंतांनी जिंकली ३३ सुवर्णांसह १०१ पदके
अाॅलिम्पिक एकता ही माेहीम राबवली जाते. यासाठी अायअाेसीकडून ३८०० काेटींची देणगी दिली जाते. यामध्ये गुणवंत खेळाडूंना स्काॅलरशिप दिली जाते. त्यामुळे खेळाडूंच्या गुणवत्तेला चालना मिळते. याच गुणवंतांनी ३३ सुवर्णांसह १०१ पदके २०१६ च्या रिअाे अाॅलिम्पिक स्पर्धेत जिंकली हाेती.
आयओसीची कमाई: सर्वाधिक महसूल प्रक्षेपण हक्कातून
50% निधी जागतिक डाेपिंगविराेधी संस्थेला (वाडा) अाणि इतर देशांच्या संघटनांना मिळताे खास फंड
1170 काेटी रुपयाे अायअाेसीने दिले हाेते यूथ अाॅलिम्पिक अायाेजनासाठी. २०१८ स्पर्धेमध्ये चार हजार युवा खेळाडू सहभागी झाले हाेते.
420 काेटी रुपये अायअाेसीने गत दाेन यूथ विंटर गेम्सच्या अायाेजनासाठी दिले हाेते. २०१६ मधील स्पर्धेत ११०० खेळाडूंचा सहभाग हाेता.
गत चार अाॅलिम्पिकमध्ये ६० टक्के याेगदान दिले अायअाेसीने
अायअाेसी अाॅलिम्पिक स्पर्धेचे यजमानपद भूषवणाऱ्या देशाला माेठी अार्थिक मदत करते. यजमान हे १९ हजार काेटींच्या मदतीचे मानकरी ठरतात. २००४ अथेन्सपासून २०१६ रिअाेपर्यंत सर्वच यजमानपद भूषवणाऱ्या देशांना ६० टक्के अार्थिक मदत करण्यात अायअाेसीचे माेलाचे याेगदान राहिले अाहे
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.