आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • 910.5 Crores Per Annum Spent On 242 Players; 9,678 Crore Revenue Of BCCI From Broadcast Rights Alone

अंडर-पेड लीग:242 खेळाडूंवर वर्षाकाठी फक्त 910.5 काेटींचा खर्च; बीसीसीआयची नुसत्या प्रसारण हक्कातून 9,678 काेटींची कमाई

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आयपीएल जगातली दुसरी सर्वात श्रीमंत लीग, मात्र खेळाडूंच्या वाट्याला निराशा
  • संघांचा खेळाडूंच्या वेतनावर ९५ काेटींचा खर्च; लीगमधून प्रत्यक्षात ६०० काेटींची कमाई

आयपीएल ही जगातील सर्वात माेठी क्रिकेटची लीग आहे. फुटबाॅल, बेसबाॅलसारख्या खेळांच्या लीगला चीत करत आयपीएलने अल्पावधीत माेठी लाेकप्रियता मिळवली. या लीगच्या माध्यमातून युवांनाही जागतिक स्तरावर आपली छाप पाडता आली. यातून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ दरवर्षी काेट्यवधी रुपयांची कमाई करते. यामुळे अमेरिकन बास्केटबाॅल लीग एनबीएनंतर आयपीएल ही जगातील सर्वात श्रीमंत दुसरी लीग मानली जाते. कारण लीगचे आयाेजक बीसीसीआय, खेळणाऱ्या संघाच्या फ्रँचायझी आणि खेळणारे खेळाडू काेट्यवधी रुपयांची कमाई करताना दिसतात. मात्र, यामध्ये टीम आणि बीसीसीआयच्या खात्यावर माेठी रक्कम जमा हाेते.

नफा ६ हजार काेटी; मानधनात फक्त ५०% वाढ
यंदाच्या १६ व्या सत्रातील आयपीएलमध्ये २४२ खेळाडू सहभागी झाले आहेत. त्यांच्यावर मानधनाच्या माध्यमातून बीसीसीआय ९१०.५ काेटींचा खर्च करते. याच कारणामुळे बीसीसीआयने सर्वच १० संघांचा सॅलरी कॅप ९५ काेटींचा मर्यादित ठेवला आहे. यामुळे खेळाडूंच्या मानधनावर एका सत्रात एकूण ९५० काेटींपेक्षा खर्च करण्याला मनाई आहे. गतवर्षी बीसीसीआयने प्रसारण हक्क पाच वर्षांसाठी विकले. यातूून मंडळाच्या तिजाेरीमध्ये ४८ हजार ३९० काेटींची भर पडली. ही रक्कम गत कराराच्या तीनपट अधिक आहे. आता बीसीसीआय याच प्रसारण हक्काच्या माध्यमातून वर्षाकाठी ९ हजार ६७८ काेटींची कमाई करताना दिसते. यामुळे कमाईमध्ये ६०० काेटींचा नफा वाढला. मात्र, खेळाडूंच्या मानधनामध्ये फक्त ५० % वाढ झाल्याचे दिसते.

विदेशी लीगमध्ये खेळाडूंना भागीदारी ५०%; आयपीएलमध्ये फक्त १८%, डब्ल्यूपीएलमध्ये दाेन सामन्यांतून सर्व टीमचा खर्च निघाला एनबीएपाठाेपाठ एनएफएल आणि मेजर लीग बेसबाॅल या जगातील सर्वात श्रीमंत लीग मानल्या जातात. या लीग वर्षाकाठी स्पर्धेच्या माध्यमातून जवळपास २ काेटींची कमाई करतात. यातील एक काेटीचा खर्च हा खेळाडूंच्या मानधनावर केला जाताे. म्हणजेच विदेशी लीगमध्ये हाेणाऱ्या कमाईत खेळाडूंची भागीदारी ५० टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचे दिसते. फायनान्स फर्म डेलाॅयने दिलेल्या माहितीनुसार इंग्लिश प्रीमियर लीगने २०२०-२१ च्या सत्रामध्ये ७१ टक्के नफा हा खेळाडूंच्या मानधनावर खर्च केला आहे. मात्र, आयपीएलमध्ये असे हाेताना दिसत नाही. आयपीएल संघ हे प्रसारण हक्कातून एकूण ४९०० काेटींची कमाई करतात. याशिवाय संघांना स्पाॅन्सरशिप, तिकीट विक्री, जर्सीतूनही काेट्यवधी रुपयांचा आर्थिक फायदा हाेताे.

प्रायोजकत्वातून १२०० कोटींपर्यंत कमाई
आयपीएल संघ सध्या प्रायोजकत्वाच्या जाहिरातींमधून एकूण १०००-१२०० कोटी रुपये कमावत आहेत. म्हणजेच सरासरी १००-१२० कोटी रुपये हाेतात. जर्सीवरील फ्रंट लोगो, बॅक लोगो आणि हेल्मेट लोगोमधून सर्वाधिक कमाई होते, ज्याची वार्षिक किंमत २६-३० कोटी रुपये आहे. दुसरीकडे बाही आणि पायजामावरील जाहिरातींसाठी संघ २ ते १० कोटी रुपये आकारत आहेत.

प्रसारण हक्क, तिकीट विक्रीने तिजाेरीत भर
बीसीसीआयचा मुख्य कमाईचा मार्ग हा प्रसारण हक्क आणि टायटल स्पाॅन्सरशिप आहे. टाटा थेट टायटल प्रायाेजकत्वासाठी बीसीसीआयला वर्षाकाठी ३५५ काेटी रुपये देते. म्हणजेच एकूण रक्कम ही ४०-५० टक्के वाढलेली आहे. याशिवाय संघ हे प्रायाेजकत्व, तिकीट विक्रीच्या माध्यमातूनही माेठी कमाई करताना दिसतात. जाहिरातीचा करारही आर्थिक फायदा करून देताे.

लीगमधील कमाईत खेळाडूंची भागीदारी
प्रीमियर लीग71%
एमएलबी54%
एनबीए50%
एनएचएल50%
एनएफएल48%
आयपीएल18%