आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुटबाॅल स्पॅनिश लीग:गतविजेत्या रिअल माद्रिद संघाच्या विजयी माेहिमेला ब्रेक

माद्रिद5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

फाॅर्मात असलेल्या गत चॅम्पियन रिअल माद्रिदच्या स्पॅनिश लीग ला लीगामधील विजयी माेहिमेला ब्रेक लागला. दहा सामन्यांतील विजयानंतर माद्रिदचा लीगमध्ये पहिलाच पराभव झाला. रायाे वालेकाेनाे क्लबने सरस खेळीतून माद्रिदला धुळ चारली. वालेकानाे संघाने ३-२ ने राेमहर्षक विजयाची नाेंद केली. सांटी काेमेसना (५ वा मि.), अल्वाराे गार्सिया (४४ वा मि.) आणि आॅस्कर ट्रेजाे (६७ वा मि.) यांनी प्रत्येकी एक गाेल करत वालेकानाेला सनसनाटी विजय मिळवून दिला. माद्रिद संघाकडून लुका माेड्रिच (३७ वा मि.) आणि एडर मिलिटाआेने (४१ वा मि.) गाेल केले. मात्र, त्यांना आपल्या टीमचा पराभव टाळता आला नाही. माद्रिद संघाने १३ सामन्यांत १० विजयाची नाेंद केली आहे.

बातम्या आणखी आहेत...