आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • A Career In Boxing Was Encouraged By His Family, Which Led To His Success.

नजरकैद:बाॅक्सिंगच्या करिअरसाठी कुटंुबीयांचा राेष ओढवला, त्‍यामुळे माेठे यश संपादन करता आले

गौरव मारवाह | चंदीगड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काेराेना महामारीमुळे मैदानावरील आणि इनडाेअरमधील खेळाला माेठा ब्रेक लागला. महामारीच्या भीतीमुळे घरातच बसावे लागले. घरच्यांच्या नजरकैदेमुळे सरावाची माेहीम बाधित झाली. मात्र, या परिस्थितीमध्येही मी कुटुंबीयांचा राेष ओढवला. यातून मला सरावामध्ये सातत्य ठेवता आले. यातूनच इंग्लंडमधील बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत पदकांची कमाई करता आली. यासाठी मला जिद्द आणि मेहनतीमुळे हे माेठे यश संपादन करता आले, अशा शब्दांत राष्ट्रकुल स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या बाॅक्सर जॅसमीन लंबाेरियाने आपल्या यशाचे गुपित कथन केले. तिने राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्यपदक पटकावले. तिने पदार्पणामध्ये ही पदक जिंकण्याची उल्लेखनीय कामगिरी केली. यामुळे कुटुंबीयांनीही आता तिला पाठबळ देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तिने आगामी २०२४ मधील आॅलिम्पिकचा प्रवेश निश्चित करण्याचा चंग बांधला आहे. यासाठी ती कसून सराव करत आहे. नव्या डावपेचासह सराव : हरियाणाची युवा बाॅक्सर जॅसमीनने सर्वाेत्तम डावपेच आखले आहेत. याच डावपेचासह आता तिने आपला सराव सुरुवात केला आहे. यातून तिला आपल्या कामगिरीचा दर्जा उंचावण्यास मदत हाेईल.

बातम्या आणखी आहेत...