आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • A Day Before The Start Of The IPL, 21 Players From England And Australia Arrived In The UAE

फ्रेंचायझींना दिलासा:आयपीएल सुरू होण्याच्या एक दिवस अगोदर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे 21 खेळाडू युएईत दाखल, 6 दिवसांऐवजी 36 तास राहावे लागेल क्वारंटाइन

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार स्टीव स्मिथ इतर खेळाडूंसोबत यूएईत दाखल.
  • क्वारंटाइन पीरियडमध्ये सवलत मिळाल्यामुळे सर्व खेळाडूंना पहिल्या सामन्यापासून संघासोबत राहता येईल

इंडियन प्रीमियर लीग(आयपीएल) फ्रेंचाइझींना दिलासा देणारी बातमी आहे. लीगमध्ये भाग घेणाऱ्या इंग्लँड-ऑस्ट्रेलियाचे 21 खेळाडू गुरुवारी संध्याकाळी ब्रिटेनवरुन चार्टर्ड फ्लाइटने यूएईत दाखल झाले. यांना फक्त 36 तासांसाठी क्वारंटाइन राहावे लागेल. त्यामुळे या खेळाडूंना पहिल्या सामन्यापासून संघासोबत राहता येईल.

आधी या खेळाडूंना 6 दिवसांसाठी क्वारंटाइन राहावे लागणार होते. यादरम्यान पहिल्या तिसऱ्या आणि सहाव्या दिवशी यांची चाचणी होणार होती. सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर 7 व्या दिवशी प्लेअर्सला बायो-सिक्योर वातावरमात एंट्री मिळणार होती. पण आता एक टेस्ट निगेटीव्ह आल्यानंतर संघात सहभागी केले जाईल.

पॅट कमिंस, मोर्गन आणि वॉर्नर यूएईत दाखल

कोलकाता नाइट राइडर्सचे तीन खेळाडून इयोन मोर्गन, टॉम बेंटन आणि पॅट कमिंस टेस्टनंतर अबु धाबी जातील. केकेआर आणि मुंबईने या शहराला आपला बेस बनवले आहे. इतर 6 संघ दुबईत राहतील.