आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायजमान डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संघाने मंगळवारी घरच्या मैदानावरील २४ व्या राज्य क्रीडा महाेत्सवामध्ये गाेल्डन हॅटट्रिक साजरी केली. यजमान बाॅस्केटबाॅल, कबड्डी आणि खाे-खाे पुरुष संघांनी आपापल्या गटामध्ये चॅम्पियन हाेण्याचा बहुमान पटकावला. तसेच यजमान महिला खाे-खाे संघ उपविजेता ठरला. तसेच स्नेहा मदनेने राैप्यपदक पटकावले.
यजमान पुरुष खाे-खाे संघाने फायनलमध्ये औरंगाबादने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर संघावर डाव व ७ गुणांनी मात करत बाजी मारली. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाने पुणे विद्यापीठाला १ गुण व २ मिनिटात हरवून तिसरा क्रमांक मिळवला. दुसरीकडे, महिला गटात यजमान औरंगाबाद संघाला मुंबई विद्यापीठाकडून पराभवाचा स्वीकार करावा लागला. मुंबईने १ गुण व ४.१० मिनिटे राखून विजेतेपद मिळवले. शिवाजी विद्यापीठाचा संघ तिसऱ्या स्थानी राहिला. मुलांमध्ये मुंबईचा सिद्धेश्वर थोरात उत्कृष्ट आक्रमक खेळाडू, औरंगाबादचा संकेत कदम उत्कृष्ट संरक्षक व राहुल मंडल उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू ठरला.
कबड्डी : यजमान पुरुष संघ चॅम्पियन, कोल्हापूर उपविजेता : कबड्डीमध्ये पुरुष गटात यजमान डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संघाने विजेतेपद पटकावले. मंगळवारी झालेल्या रोमांचक फायनलमध्ये औरंगाबादने कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठावर २८-२३ गुणांनी विजय मिळवला. या सामन्यात विजेत्या संघाकडून अल्केश चव्हाण, अक्षय सूर्यवंशी, राम अडगळे यांनी उत्कृष्ट चढाई व अष्टपैलू कामगिरी केली. सुरेश जाधव, रोहित बिनवडे, जावेद पठाण, राहुल शिरोडकर यांनी त्यांना चांगली साथ देत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. शिवाजी विद्यापीठाने उपविजेतेपद मिळवले. त्याचबरोबर, मुंबई विद्यापीठाने यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक संघाला ४३-२३ गुणांनी पराभूत करत तिसरा क्रमांक पटकावला.
बास्केटबॉल : पहिला सेट गमावल्यानंतरही यजमानांनी खेचून आणली विजयश्री यजमान बास्केटबाॅल पुरुष संघाने फायनलमध्ये नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ सामन्यात ३-१ ने मात करीत केली. पहिला सेट गमावल्यानंतर दमदार पुनरागमन करताना यजमान संघाने विजयश्री खेचून आणली. कर्णधार शुभम गवळी शुभम लाटें अभिषेक अंभोरे, अभय हजारी, राजेश्वर परदेशी, सत्यजित परदेशी, अजय पवार, साहिल धनवटे, गणेश, स्वप्नील धनवटे, नरेंद्र चौधरी ने सर्वाेत्तम खेळी केली.
स्नेहाची ११.१४ मीटर तिहेरी उडी अॅथलेटिक्समध्ये तिहेरी उडी प्रकारात यजमान डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या स्नेहा मदनेने रौप्यपदक आपल्या नावे केले. शिवाजी विद्यापीठाच्या प्रगती संकपाळने ११.३५ मीटर उडी घेत सुवर्णपदक जिंकले. यजमान खेळाडू स्नेहा (११.१४ मी.) तिच्या पेक्षा केवळ .१६ से.मीटर मागे राहिली. नागपूर विद्यापीठाच्या उन्नती चिकेवाने (११.०३ मीटर) कांस्यपदक जिंकले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.