आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआयपीएल १६ मधील १७ व्या रोमांचक सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जवर अवघ्या ३ धावांनी विजय मिळवला. अखेरच्या षटकात भारताचा माजी उत्कृष्ट फिनिशर महेंद्रसिंग धोनी विजय मिळवून देऊ शकला नाही. अखेरच्या चेंडूंवर चेन्नईला विजयासाठी ५ धावांची गरज होती. धोनीने एक धाव घेतली.
नाणेफेक जिंकून चेन्नईने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम खेळताना राजस्थानने २० षटकांत ८ बाद १७५ धावा उभारल्या. यात जोस बटलरने चार सामन्यात तीसरे अर्धशतक झळकावले. त्याने ३६ चेंडूंत १ चौकार व ३ षटकार खेचत ५२ धावा ठोकल्या. पड्डीकलने ३८, आर. अश्विनने ३०, हेटमायरने ३० धावा काढल्या. चेन्नईकडून आकाश सिंग, तुषार देशपांडे आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी दोन-दोन गडी बाद केले. प्रत्युत्तरात चेन्नई सुपर किंग्ज २० षटकांत ६ बाद १७२ धावा करु शकला. यात डेव्हिड कॉन्वेने सर्वाधिक ५० धावांची अर्धशतकी खेळी केली. अजिंक्य राहाणे पुन्हा लयीत आला. त्याने ३१ धावा केल्या. रवींद्र जडेजा नाबाद २५ आणि महेंद्रसिंग धोनी ३२ धावांवर नाबाद राहिला. राजस्थानच्या आर. अश्विन व युजवेंद्र चहलने प्रत्येकी दोन बळी घेतले.
टायटन्स प्रथमच मोहालीच्या मैदानात आज उतरणार
मोहाली | आयपीएल १६ मधील १८ वा सामना आज पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. मोहालीमध्ये संध्याकाळी ७.३० वाजता सामना सुरू होईल. पंजाबचे घरचे मैदान मोहालीवर गुजरातचा हा पहिलाच सामना असेल. या सामन्यात दोन्ही संघांचा पुन्हा विजयी लय मिळवण्याचा प्रयत्न असेल. हा सामना जिंकणारा संघ अव्वल-३ मध्ये पोहोचेल. दोन्ही संघांनी पहिले २ सामने जिंकल्यानंतर मागील सामने गमावले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.