आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादहाव्या मानांकित जेनिक सिनरविरुद्ध मियामी आेपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील पराभव स्पेनच्या अल्कारेझला चांगलाच महागात पडला. याच लाजिरवाण्या पराभवामुळे त्याला आता जगातील नंबर वनचे स्थान गमावावे लागणार आहे. दहाव्या मानांकित जेनिक सिनरने शनिवारी पुरुष एकेरीच्या उपांत्य सामन्यात नंबर वन अल्कारेझचा पराभव केला. त्याने ६-७,, ६-४, ६-२ अशा फरकाने सामना सनसनाटी विजय संपादन केला. यासह त्याला स्पर्धेच्या अंतिम फेरीतील आपला प्रवेश निश्चित करता आला. आता त्याचा किताबासाठीचा अंतिम सामना रविवारी माजी नंबर वन डॅनियल मेदवेदेवशी हाेणार आहे.
२७ वर्षीय मेदवेदेवने पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीमध्ये कारेन खाचानाेवचा पराभव केला. त्याने ७-६, ३-६, ६-३ ने सामना जिंकला. यासह त्याला फायनल गाठता आली. यासह मेदवेदेव हा १९८१ नंतर सलग पाच एटीपी फायनलमध्ये धडक मारणारा पहिला टेनिसपटू ठरला.
-क्विताेव्हा १३ व्यांदा फायनलमध्ये : झेक गणराज्यच्या पेत्रा क्विताेव्हाने शनिवारी १३ व्यांदा डब्ल्यूटी-१००० फायनल्स गाठली आहे. या माजी नंबर वन आणि दाेन वेळच्या विम्बल्डन चॅम्पियन टेनिसपटूने महिला एकेरीच्या उपांत्य सामन्यात राेमानियाच्या साेराना क्रिस्टियाचा पराभव केला. पेत्रा क्विताेव्हाने ७-५, ६-४ अशा फरकाने सामना जिंकला. आता तिचा अंतिम सामना विम्बल्डन चॅम्पियन खेळाडू एलिना रायबकिनाशी हाेणार आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.